रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांच्या पार! तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

सक्रिय रुग्णसंख्येतही लक्षणीय घट

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात कहर केलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम आता हळूहळू कमी होताना पाहायला मिळतोय. महत्त्वाचं म्हणजे रुग्णसंख्या घटत असली तरी मृत्यूदराची चिंता अजूनही कायम आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील मृत्यू घटले असले तरी कोविड बळींचा आकडा हा ३ हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचलाय.

काय आहे आकडेवारी?

गेल्या २४ तासांत राज्यात ३०२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ४१९ रुग्ण हे कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान, ४७ रुग्ण हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असून २५५ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत.

महत्त्वाचं म्हणजे दिवसभरात एकूण ३ हजार ४६९ चाचण्या करण्यात आल्यात. दरम्यान, चाचण्यांच्या तुलनेत कोरोना बाधित रुग्ण आढळून येण्याचं प्रमाणही कमी झालंय. संपूर्ण देशासह राज्यातही कोरोना रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचं आरोग्य खात्यानं जारी केलेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे. सध्याच्या घडीला राज्यात ३ हजार ३७३ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर ३८ रुग्णांचा दिवसभरात डिस्चार्जही देण्यात आला आहे.

कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येमुळे रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांच्या पार गेला आहे. सध्याच्या घडीला राज्याचा रिकव्हरी रेट हा ९६.०७ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर कोविड केअर सेंटरमधील खाटाही रिकाम्या असल्याचं आकडेवारीवरुन समोर आलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!