करोना, पावसाचा व्यापाऱ्यांना फटका

चतुर्थी दोन दिवसांवर आली तरी खरेदीची लगबग नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: गणेश चतुर्थीला दोनच दिवस शिल्लक असले तरी खरेदीसाठी अजूनही बाजारात गर्दी दिसत नाही. करोनाची भीती व दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे लोक खरेदीसाठी बाहेर पडण्याचे टाळत आहेत. पणजीप्रमाणेच राज्यातील बहुतांश बाजारपेठांत चतुर्थीसाठी लागणाऱ्या साहित्याची दालने थाटण्यात आली असली तरी ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद अद्यापही लाभत नसल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे.

हेही वाचाः आयएनएस हंसाने साजरा केला हीरक महोत्सव

यंदा उत्साह नाही

पूर्वी चतुर्थीची खरेदी पंधरा दिवस आधीपासून सुरू होत असे. यंदा तसा उत्साह दिसत नाही. गेल्या वर्षीही करोनाच्या भीतीच्या सावटाखाली चतुर्थी साजरी झाली होती. आता करोना संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी करोनामुळे होणारे मृत्यू मात्र थांबताना दिसत नाहीत. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन लोकही सावधगिरी बाळगत आहेत. बाजारात मुलांना आणण्याचे प्रमाण खूप कमी असल्याने खास मुलांचे आकर्षण असलेले फटाके व इतर व्यापार काही प्रमाणात मंदावलेला दिसत आहे. यावर्षीही करोनाची भीती तशीच आहे. यावर्षी बहुतेकांच्या घरी पाच दिवस मूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी साध्या पद्धतीने चतुर्थी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. करोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती कोलमडलेली आहे. बाजारातील खरेदीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. यावर्षी अनेक सार्वजनिक मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करण्याचं ठरवलं आहे.

दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत

दरवर्षी चतुर्थीच्या काळात सजावट, विद्युत राेषणाई, फळ, फुले यांची दुकाने थाटली जातात. गेल्या वर्षी करोनाचा व्यवसायवर परिणाम झाला होता. यावर्षीही अजून खरेदीला जोर आलेला नाही. ग्राहकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही ग्राहकांचा अल्प प्रतिसाद आहे. दोन दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने ग्राहक मार्केटमध्ये येणे टाळत आहेत, असे विक्रेते विष्णू च्यारी यांनी सांगितलं.

हेही वाचाः ‘आप’च्या दारोदारी भेटीनं केला पणजीवासियांच्या हृदयाला स्पर्श !

कपड्यांच्या खरेदीवर परिणाम

पूर्वीसारखी सण-उत्सवांना होणारी कपड्यांची खरेदी मंदावली आहे. पूर्वी चतुर्थीच्या काळात कपडे खरेदीसाठी लोक येत होते. पण आता ऑनलाईन खरेदीवर लोक भर देत आहेत. याचा कपडे व्यवसायावर खूपच परिणाम झाला आहे, असं कपड्यांचे व्यापारी सुहेल शेख यांनी सांगितलं.

हा व्हिडिओ पहाः Corona Updates | CM | सण साजरे करताना, कोरोनाचे नियम पाळाच!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!