Corona +ve | आमदार बाबूश यांना कोरोनाची लागण

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची चिंता वाढली

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी​ आपण कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचण्या करून घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.

एकूणच राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या डोकेदुखी वाढतेय. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्याही वाढतेय. अधिवेशनात बाबूश यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे एकूणच त्यांच्या संपर्कांत आलेल्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

तर दुसरीकडे वाढत्या कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आगामी होळी, इस्टर, शब-ए-बारात, ईद उल फित्र या सणांवेळी सार्वजनिक स्थळे, बाजारपेठा, उद्यानांत गर्दी टाळावी असे आदेश जारी करण्यात आलेत. आरोग्य खात्याकडून हे आदेश जारी करण्यात आलेत. तर जिल्हा प्रशासनाला नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!