महाभयंकर! गुरुवारी जवळपास सहाशे नव्या रुग्णांची भर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. रुग्णवाढीचा नवा उच्चाकं गुरुवारी पाहायला मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून प्रत्येक दिवशी अडीचशेपेक्षा जास्त कोविड रुग्ण सापडत होते. अशातच बुधवारीनंतर गुरवारीही तब्बल ५०० पेक्षा जास्त नवे रुग्ण सापडलेत तर दोघांचा मृत्यू झालाय. गुरुवारी आढळलेली रुग्णसंख्या तर ६००च्या जवळपास आहे. गुरुवारी राज्यात तब्बल ५८२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महत्त्वाची आकडेवारी काय सांगते?

तब्बल ५८२ नवे रुग्ण, दोघांचा मृत्यू

एकूण सक्रिय रुग्णसंख्या ३ हजार ३३१

उत्तर गोव्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण पर्वरीत ३२६

दक्षिण गोव्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण मडगाव ३४८

पणजीत २९१, कांदोळीत २४०,
फोंड्यात २४२ , म्हापशात १७९ सक्रिय रुग्ण

रिकवरी रेट ९३.१४ टक्क्यांवर घसरला

आतापर्यंत ८४२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

रिपोर्टची प्रतीक्षा

दरम्यान, राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येसोबत चाचण्यांची प्रतीक्षाही कायम आहे. तब्बल ३ हजार २०६ चाचण्यांचे अहवाल येणं बाकी आहे. त्यामुळे रुग्णवाढीची चिंता आणखी वाढेल, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. राज्यातील कोरोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.

मुख्यमंत्र्यांचं आवाहन

वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी नियम पाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्यासोबत लॉकडाऊन आणि संचारबंदीनं सामान्यांना फटका बसेल. त्यामुळे असा निर्णय घेण्याची वेळ येण्यापेक्षा लोकांनी लसीकरणासाठी प्रामुख्यानं पुढे यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. कोरोनाशी लढण्यासाठी एक रणनिती सरकारनं आखली आहे. त्याला लोकांनीही सहकार्य करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!