कोरोनामुळं आईवडील गमावलेत, मुलं पोरकी झालीत; काळजी घ्यायला कुणी नाही? इथे संपर्क करा…

कोविडमुळे अनाथ झालेली मुलं आढळून आल्यास 1098 या हेल्पलाईवर संपर्क साधा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अनेकांनी आपल्या घरातलं माणूस गमावलं आहे. काही ठिकाणी तर आई-वडील दोघांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू झाल्याने मुलं पोरकी झाल्याच्या बातम्या येत आहेत. कोविड -19 च्या आजारात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या मुलांची काळजी घेण्यासाठी कुणी नसल्याने या मुलांची काळजी घेण्यासाठी काही समाजसेवी संस्था पुढे आल्यात.

हेही वाचाः महाराष्ट्रात कोविड-19 मुळे 98 मुलांनी दोन्ही पालक गमावले

इथे संपर्क करा

राज्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमवून अनाथ झालेल्या मुलांची माहिती मिळाल्यास 1098 या चाईल्डलाईन हेल्पलाईनशी संपर्क साधावा असं आवाहन या संस्थांकडून करण्यात आलं. 100 क्रमांक करून जवळच्या पोलिस स्टेशनलाही याची माहिती दिली जाऊ शकते. जिल्हा महिला आणि बाल विकास खाते, मुलांचे हक्क संरक्षणासाठीचा राज्य आयोग आणि बाल कल्याण समितीशी संपर्क करून या मुलांची माहिती दिली जाऊ शकते.

मुलांची सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी

कोरोना परिस्थितीत इतर अनेक समस्यांबरोबर बालकांच्या समस्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या बालकांचे आरोग्य, संरक्षण, बालविवाह यासारख्या समस्यांसोबतच कोविड -19 मुळे दोन्ही पालकांच्या मृत्यू मुले अनाथ होण्याची गंभीर समस्या समोर येत आहे. अशा बालकांचा काही वेळा आप्तस्वकीयांकडून स्वीकार न झाल्यामुळे या समस्यांमध्ये अधिकच भर पडत आहे. असे प्रकार घडू नये याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे अशी प्रकरण घडताना दिसल्यास त्यात काय करता येईल त्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास 9673792704 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन समाजसेवी संस्थांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!