खळबळजनक! मांडवीतल्या दोन कॅसिनोमध्ये कोरोनाचा शिरकाव

सिध्देश सावंत | प्रतिनिधी
पणजी : गेल्या आठ महिन्यांपासून बंद असणारे कॅसिनो नोव्हेंबरमध्ये सुरु कऱण्यात आले. मात्र आता या कॅसिनोमध्येही कोरोनानं शिरकाव केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
मांडवीतल्या दोन कॅसिनोमध्ये कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 20 पेक्षा जास्त कोरोना पॉढिटिव्ह रुग्ण सापड्लयानं एकच घबराट उडाली आहे. 1 नोव्हेंबरपासून राज्यात कॅसिनो सुरु करण्यात आले होते. त्यानंतर कॅसिनोमध्ये पुन्हा खेळ रंगला होती. गर्दी वाढू लागली होती. कॅसिनोमुळे पर्यटकांचीही राज्यातली ये-जा वाढल्याचं पाहायला मिळालं होतं.
मात्र आता कोरोना रुग्ण आढळल्यानं कॅसिनो चालकांनीही धास्ती घेतली आहे. 20 पेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्यानं कॅसिनोमधून कोरोनाचा संसर्ग आणखी वाढेल असा अंदाज वर्तवला जातोय. त्या पार्श्वभूमीवर आता काय काळजी आणि खबरदारी घेतली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.
देशाच्या तुलनेत गोव्यात कोरोना आटोक्यात आहे, असं आकडेवारी सांगते. पण चिंताजनक बाब म्हणजे राज्याचा मृत्यूदर. नोव्हेंबर महिना आता संपायला आला. पण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या २० दिवसांतच कोरोनाचे ६८ बळी गेलेत. ही आकडेवारी काळजी करायला लावणारी आहे.
शुक्रवारी 20 तारखेला राज्यात कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी गेला. त्यामुळे राज्यातील कोरोना मृतांची आकडा आता 672 वर पोहोचलाय. विशेष म्हणजे गेल्या 20 दिवसांत तब्बल 68 रुग्ण कोरोनामुळे दगावलेत. या आकडेवारीत वृद्ध रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. राज्याचा रिकवरी रेट 95 टक्क्यापेक्षा जास्त आहे. मात्र तरिही मृत्यूदर सगळ्यांचा घाबरवणारा असा आहे.
सध्या राज्यात 1295 इतक्या एक्टीव रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर जवळपास 44 हजार रुग्ण कोरोनातून बरे झालेत. राज्यात पर्यटकांचा ओघ वाढतोय. अशा पार्श्वभूमीवर आता कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जातेय.