तब्बल 43 वेळा कोरोना पॉझिटिव्ह आलेत ‘हे’ आजोबा !

ब्रिटनमधील ब्रिस्टल इथं राहणाऱ्या डेव स्मिथ यांनी केलंय नवं रेकॉर्ड !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : काही जणांना एकदा, काही जणांना दोन वेळा कोरोना झाल्याच्या केसेस खूप आहेत. पण ब्रिटनमधील ब्रिस्टल येथे राहणाऱ्या डेव स्मिथ या वृद्धाने कोरोना संसर्गाबाबत रेकॉर्ड केले आहे. त्यांना तब्बल ४३ वेळा कोरोना झालाय. पण आश्चर्य म्हणजे त्यातूनही ते सहीसलामत बाहेर आले.

डेव निवृत्त ड्रायविंग प्रशिक्षक आहेत. कोरोना संसर्ग झाल्यामुळे त्यांना ७ वेळा रुग्णालयात हलविण्याची वेळ आली. ‘बीबीसी’ ला दिलेल्या एका मुलाखतीत डेव म्हणाले, ‘माझा उत्साह कमी होत होता. एका रात्री तर सतत पाच तास मला खोकला आला. जगण्याची माझी आशा मावळली होती. शेवटी मी माझ्या कुटुंब सदस्यांना बोलावले आणि त्यांना गुडबाय केले. पत्नी लीन ला मी म्हणालो, जे चाललेय ते फार वाईट आहे. मी यापुढे हे सहन करू शकणार नाही. मला जाऊ दे.’

लीन सांगते, डेवची अवस्था खरेच खूप वाईट होती. तो यापेक्षा अधिक सहन करू शकणार नाही हे आम्हाला दिसत होते. डेव यांच्यावर अँटी व्हायरल औषध मिश्रण उपचार दोन आठवडे केले गेले. डॉक्टर वारंवार कोरोना चाचणी करत होते. दोन आठवडे हे उपचार घेतल्यावर डॉक्टरने जेव्हा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले तेव्हा प्रथम कुणाचाच विश्वास बसला नाही. एक आठवड्याने पुन्हा टेस्ट केली तेव्हा सुद्धा निगेटिव्ह रिपोर्ट आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!