CORONA | कोविड पॉझिटिव्हिटीत गोवा तिसरा

Covid19 india.orgची आकडेवारी; महाराष्ट्र पहिल्या, तर पंजाब दुसऱ्या स्थानी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राष्ट्रीय आकडेवारीनुसार महाराष्ट्र, गोवा, पंजाब, मध्य प्रदेश आणि पोंडीचेरीमध्ये कोविड संसर्गाचं प्रमाण ५ टक्क्यांहून अधिक झालंय. पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे दर १०० चाचण्यांमागे कन्फर्म झालेल्या कोविड रुग्णांची संख्या १४ दिवसांच्या कालावधीत ५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर राज्य रेड झोनमध्ये असल्याचं मानलं जातं.

हेही वाचाः चित्तथरारक! बाईक, बिबट्या आणि लक्षवेधी फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

Covid19 india.org ची आकडेवारी

Covid19 india.org वरून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र (२१.४ टक्के) आणि पंजाब (७ टक्के) नंतर मागोमाग १४ ते २७ मार्च या १४ दिवसांच्या कालावधीत पॉझिटिव्हिटी रेट ६.६ टक्के असलेलं गोवा हे तिसरे सर्वोच्च राज्य आहे आणि त्यानंतर पुढे मध्य प्रदेश (6%) आणि पोंडीचेरी (४.८%) यांचा क्रमांक लागतो. गेल्या १४ दिवसांच्या कालावधीत म्हणजेच १ ते १४ मार्च या कालावधीत गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४.५ टक्क्यांवर होता आणि पुढील दोन आठवड्यांत तो २.१ टक्क्यांनी वाढला.

हेही वाचाः गोव्यात बुधवारी २०० नव्या कोरोना रुग्णांचं निदान तर महाराष्ट्रात २००पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू

एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले….

गोव्यातील कोविड रुग्णांच्या वाढत्या संख्येवर एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी आपलं मत व्यक्त केलंय. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणालेत, ‘लोकांना सुट्ट्या हव्यात. ते गोव्यात येतायत, जो अनावश्यक प्रवास आहे. आम्ही निर्बंध चालू ठेवले असते तर एवढी मोठी वाढ आम्हाला दिसली नसती.’ हे लक्षात घ्यायला हवं की, केंद्रीय नियमांनुसार, ५ टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेटमुळे राज्य विविध कठोर उपाययोजना लादण्यास बांधिल होतं. महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याचा विचार करतंय आणि इतर राज्य गोव्यातून आलेल्या पर्यटकांकडून कोविड-निगेटिव्ह प्रमाणपत्रांचा आग्रह धरतायत, तर कोविड-निगेटिव्ह सर्टिफिकेटचा आग्रह धरणाऱ्या राज्याच्या आरोग्य तज्ज्ञ पुनरावलोकन समितीने दिलेल्या सूचनांकडे राज्य सरकारने लक्ष दिलेले नाही. अलीकडेच आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की, सरकार कोविड चाचणी क्षमता वाढवतंय. तर, केंद्रीय नियमांनुसार पॉझिटिव्हिटीचं प्रमाण जास्त आहे याचा अर्थ राज्य स्क्रीनिंग टेस्ट करण्यात कमी पडतंय.’

हेही वाचाः ४५ वर्षांवरील व्यक्तींचे आजपासून लसीकरण, राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर

याशिवाय गोव्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सोमवारच्या आरोग्य बुलेटिननुसार गोव्याचा कोविड रुग्णांचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा प्रति दशलक्ष जास्त आहे. गोव्याची सरासरी ३६,३०२ आहे, तर राष्ट्रीय सरासरी ८,७२४ आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!