#BIG BREAKING : कोविडच्या पार्श्वभूमीवर उत्सवांवर मर्यादा

सरकारकडून सार्वजनिक स्तरावर नियम जारी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव राज्यात दिसू लागला आहे. येत्या काही दिवसांत येणार्‍या सर्वच धर्मांच्या सणांच्या पार्श्वभूमीवर गोवा सरकारनं काही निर्बंध जारी केले आहेत.

होळी, शब ए बारात, ईस्टर, ईद उल फित्र आदी सण येत्या काही दिवसांत येत आहेत. हे सण साजरे करण्यासाठी लोक एकत्र जमतात. मात्र सध्या राज्यात कोरोनाचा वाढलेल प्रकोप पाहता, सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा घालण्यावाचून पर्याय नाही. राज्य सरकारने या सर्व सणांसाठी एसओपी जारी करताना लोकांना सतर्क केले आहे.

काय आहेत निर्बंध…

होळी, शब ए बारात, ईस्टर, ईद उल फित्र आदी सण साजरे करताना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव केला आहे. त्यासाठी केंद्र सरकारनं यापूर्वीच जारी केलेल्या एसओपींच्या संदर्भातील पत्राचा हवाला देण्यात आलाय. यानुसार सार्वजनिक स्तरावर हे सण साजरे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. मार्केट, सार्वजनिक स्थळं, बाग-बगिचे, मैदाने आदी ठिकाणी असे कार्यक्रम किंवा उत्सव आयोजित करण्यावर बंधन घालण्यात आले आहे.

पोलिस, जिल्हाधिकार्‍यांना निर्देश

सार्वजनिक आरोग्य विभागानं या संबंधी परिपत्रक जारी केले असून उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा पोलिसांना याबाबत निर्देश दिले आहेत. अशा प्रकारांवर करडी नजर ठेवली जाणार असून दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांनाही कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!