कोरोनाचं थैमान! राज्यात 24 तासांत 5 जणांचा बळी

आठ दिवसांत 22 कोविडबाधितांचा मृत्यू

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस आवाक्याबाहेर जाताना दिसतेय. गुरुवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल जाहीर करण्यात आला. बांबोळीच्या गोमेकॉत तिघांचा, तर मडगावच्या हॉस्पिसिओत दोघांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत एकूण 862 रुग्णांचा मृत्यू

गेल्या आठ दिवसांत तब्बल 22 कोविडबांधितांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत राज्यात एकूण 862 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. गुरुवारी जाहीर झालेल्या मृतांच्या आकडेवारीमुळे राज्यातील कोरोनाची भयकारक स्थिती आणखी गडद झाली. पाचही जण पुरुष आहेत. त्यातील एकाचं वय 37, तर दुसर्‍याचं 42 आहे. अन्य तिघे 60 वर्षांवरील आहेत. एका रुग्णाला गोमेकॉत अत्यवस्थ स्थितीत दाखल करण्यात आलं. त्याचा 6 तासांतच उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

8 दिवसांत 22 मृत्यू

८ एप्रिल
दिवसभरातील मृत्यू २
एकूण मृत्यू ८४२

९ एप्रिल
दिवसभरातील मृत्यू ३
एकूण मृत्यू ८४५

१० एप्रिल
दिवसभरातील मृत्यू १
एकूण मृत्यू ८४६

११ एप्रिल
दिवसभरातील मृत्यू २
एकूण मृत्यू ८४८

१२ एप्रिल
दिवसभरातील मृत्यू २
एकूण मृत्यू ८५०

१३ एप्रिल
दिवसभरातील मृत्यू ३
एकूण मृत्यू ८५३

१४ एप्रिल
दिवसभरातील मृत्यू ४
एकूण मृत्यू ८५७

१५ एप्रिल
दिवसभरातील मृत्यू ५
एकूण मृत्यू ८६२

देशभरात तब्बल 2 लाखापेक्षा नवे रुग्ण

देशभरात नव्यानं 2 लाख 739 कोरोना रुग्णांची भर अवघ्या 24 तासांत पडल्याची नोंद गुरुवारी करण्यात आली. हा एक नवा रेकॉर्ड आहे. 2021मधील रुग्णवाढीचा हा उच्चांक आहे. आरोग्य खात्यानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण देशभरात तब्बल 1 हजार 38 रुग्ण दगावलेत. सलग 9 दिवस 1 लाखापेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले होते. तर 11 दिवसांत रुग्ण दुप्पट झाल्याचं अधोरेखित झालं असून 1 लाखावरुन आता 2 लाख रुग्ण देशात आढळून येत आहेत. दिवसाला 2 लाख रुग्ण आढळून येत असल्यानं देशात कोरोनाची दुसरी लाट वेगानं पसरत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!