कोरोनाचा उद्रेक! फोंड्यातील मातृछाया संस्थेच्या वसतीगृहात तब्बल १८ जणांना लागण

राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यानं चिंता

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्यात शनिवारी सर्वांधिक एकाच दिवशी 154 नवीन कोविड रूग्णांची नोंद झाल्यानंतर आता या विषाणूंचा पुन्हा झपाट्याने प्रसार सुरू झाल्याची चिन्हे दिसू लागतील. दक्षिण गोव्यातील फोंडा तालुक्यात ढवळी येथील मातृछाया संस्थेत मुलींच्या वसतीगृहात 18 नवीन रूग्ण सापडले आहेत. ही घटना 20 मार्चची आहे. 45 विद्यार्थी आणि 17 कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. यापैकी काहीजणांचे अहवाल अद्याप यायचे आहेत. सर्व 18 कोविडबाधीत लक्षणेविरहीत असून त्यांना या संस्थेतच अलगीकरणात ठेवण्यात आलंय. यासंबंधी उपजिल्हाधिकारी आणि फोंडा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना या संस्थेचा परिसर लघू कंटेनमेंट झोन जाहीर करा असे पत्र पाठवल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रूचिका कट्याल(आयएएस) यांनी हा आदेश जारी केला.

हे सर्व कोविडबाधीत बरे होऊन त्यानंतर 14 दिवसांपर्यंत हा परिसर कंटेनमेंट झोन असेल,असेही या आदेशात म्हटलेय. या अनुषंगाने या परिसरात संशयीतांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. यासाठी रॅपीड रिस्पॉन्स टीम स्थापन करण्यात आलीय. ह्यात फोंडा उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, फोंडा पोलिस उपअधिक्षक, फोंडा आरोग्याधिकारी, फोंडा पालिका मुख्याधिकारी, फोंडा अग्निशमन अधिकारी, फोंडा मामलेदार, फोंडा नागरी पुरवठा अधिकारी आणि फोंडा पीडब्लूडी कार्यकारी अभियंते यांचा समावेश करण्यात आलाय.

हेही वाचा – गर्दीच्या ठिकाणी रॅन्डम कोरोना टेस्ट! मुंबईत होऊ शकतं तर गोव्यात का नाही?

कंटेनमेन्ट झोन जाहीर

फोंडा तालुक्यातील कवळे पंचायतक्षेत्रातील ढवळी या प्रभाग-4 मध्ये कंटेनमेंट झोन जाहीर झालाय. या झोनमधील प्रत्येक घरातील व्यक्तीची चाचणी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने या टीमला निर्देश देण्यात आलेत. आरोग्यधिकाऱ्यांच्या अधिकाराखाली हे काम करण्यात येणार आहे. संयुक्त मामलेदार जान्हवी काळेकर आणि साईश नाईक यांची कंटेनमेंट झोनसाठी ड्यूटी दंडाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

हेही वाचा – कोरोनाबाबत सरकार अजिबात गंभीर नाही

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!