12 दिवसांत गोव्यात 706 मृत्यू! दुसऱ्या लाटेत कल्पनाही करता येणार नाही एवढा प्रचंड फटका

राज्यातील मृत्यूदराची चिंता कायम

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : राज्य सरकारवर सातत्यानं कोविडच्या नियोजनावरुन केली जाणारी टीका, हायकोर्टाच्या कानपिचक्या या सगळ्यात सर्वसामान्य गोंयकार भरडला जातो आहे. आरोग्य खात्याकडून जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा ७० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना मृतांचा आकडा हा मे च्या अवघ्या १२ दिवसांतच अठराशेच्या पार गेला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.

हेही वाचा – ब्रेकिंग | जीएमसीतील ऑक्सिजन तुटवड्याची हायकोर्टाकडून गंभीर दखल

काय आहे बुधवारची आकडेवारी?

बुधवारी राज्यात नवे २ हजार ८६५ रुग्ण आढळून आलेत. तर २ हजार ८४० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. दरम्यान, २ हजार ५७२ रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. तर ३३४ रुग्णांना ह़स्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे राज्यात २१२ रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी एकूण ६ हजार ९२० कोरोना चाचण्या करण्यात आल्यात. सध्याच्या घडीला राज्याचा रिकव्हरी रेट हा ७२.८४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. तर सक्रिय रुग्णसंख्या ही ३२ हजार ७९१वर पोहोचली आहे.

हेही वाचा – भयंकर! तब्बल 9 दिवसांनी कोरोना चाचणीचा रिपोर्ट, फ्रंटलाईन कर्मचाऱ्याची कहाणी संताप आणणारी

मे महिन्यातली धक्कादायक आकडेवारी!

मे महिन्याच्या पहिल्या १२ दिवसांतच तब्बल ७०० पेक्षा जास्त रुग्ण दगावले आहे. तर नव्या ३६ हजार ३८७ रुग्णांची राज्यात भर पडली आहे. दुसरीकडे मे महिन्याच्या पहिल्या १२ दिवसांत २६ हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण हे बरेही झाले आहे. मात्र एकूण या आकडेवारीवरुन कोरोना रुग्णांच्या मृत्यूनं सगळ्यांनाच धडकी भरवली आहे. दोन महिन्यांपूर्वी १ हजारच्या आत असलेला कोरोना बळींचा आकडा हा वेगानं वाढला असून आता तो १ हजार ८००च्या पार गेला आहे. त्यातील ७०६ मृत्यू हे तर मे महिन्याच्या पहिल्या १२ दिवसांतच नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत कुणाला कल्पनाही करता येणार नाही, इतका प्रचंड फटका बसल्याचं पाहायला मिळतंय.

हेही वाचा – सकारात्मकता पसरवूया! १२ दिवसांत तब्बल ३७ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनातून बरे झाले

कोरोना मुळे राज्यात आतापर्यंत १८७४ मृत्यू झाले आहेत. त्यातील तब्बल ७०६ मृत्यू हे आतापर्यंतच्या मे महिन्यातच नोंदवण्यात आले आहेत. मे महिना सुरु होण्याआधी मृतांचा आकडा हा १ हजार १६८वर होता. मात्र गेल्या १२ दिवसांतील मृत्यूदराचा वेग किती भीषण आहे, हे खालील १२ दिवसांच्या आकडेवारीवरुन लक्षात येईल.

पाहा आकडेवारी

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य खात्याचा चार्ज, ऑक्सिजनवरून सरकार चक्रव्युहात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!