कायद्याचा भंग करून हडफडेत जमिनीचे रूपांतरण!

नगरनियोजन मंत्र्यांनी दिला कारवाईचा इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : हडपडे येथील १३,९७५ चौरसमीटर जमीन बांधकामासाठी तसेच व्यावसायिक वापरासाठी रूपांतरित करण्यात आली आहे. मुंडकार कायदा आणि जमीन कायदा यांचा हा भंग आहे. म्हणून संबंधितांवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगरनियोजन मंत्र्यांनी दिला आहे.
हाडफडे-नागवा ओडीपीमध्ये अशा प्रकारचे अनेक गैरव्यवहार झाले आहेत. सर्व गैरव्यवहारांची चौकशी करून कारवाई केली जाईल. नगरनियोजन कायदा तसेच जमीन महसूल कायद्याचे उल्लंघन करून गैरव्यवहार करण्याचे प्रकार वाढले आहे. हे गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचाः‘द ग्रेट गामां’चा गुगलकडून सन्मान! वाचा सविस्तर…

सर्व अनियमितता हळूहळू उघड होत आहे

हडफडे येथे सर्वे नंबर ४० या भूखंडात मोठा घोळ झाला आहे. हडफडे-पर्रा-नागवासह अन्य सर्वच ओडीपींमध्ये त्रुटी आढळल्याने त्या रद्द करण्यात आल्या आहेत. सल्लागारांच्या मदतीने नवीन ओडीपी तयार केले जातील. ओडीपीची प्रक्रिया करताना सर्व अनियमितता हळूहळू उघड होत आहेत. गैरप्रकारांवर कारवाई करण्याबरोबरच पर्रा, नागवा, कांदोळी, कळंगुट या सर्व गावांना पीडीएमधून बाहेर काढण्याची गरज आहे. अवैध रूपांतराचा शोध घेतल्यानंतरच ही गावे पीडीएतून काढून टाकणे शक्य होणार आहे.
हेही वाचा:’हे’ आहेत पेट्रोल-डिझेल चे ‘नवे’ दर…

अहवाल तयार केला जाणार

पीडीए तसेच जमिनीच्या रूपांतरणात अनेक गैरप्रकार झाले आहेत. सर्वांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल. किती गैरव्यवहार झाला, कशा प्रकारे झाला आणि गुन्ह्यांची माहिती यांचा अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल सभागृहात मांडला जाईल, असे नगरनियोजन मंत्र्यांनी म्हटले आहे.
हेही वाचाःम्हापसात कारचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!