कंटेनर आणि दुचकीच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी
पर्वरी : गोव्यातील अपघात सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वी दोन कॉस्टेबल पोलिसांना गाडीनं ठोकल्याचा प्रकार घडला. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यभर ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि नाकाबंदी सुरू आहे. तरीही अपघातांचं सत्र सुरूच आहे. शनिवारी पर्वरी येथिल ओ कोकेरो जंक्शनजवळ रात्री १० च्या सुमारास एक भीषण अपघात घडला. कंटेनर आणि दुचकीची धडक होऊन पर्वरीलीत दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचाः कारची झाडाला धडक बसल्याने अपघात
कंटेनरच्या टायरखाली गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू
पर्वरीतील ओ कोकेरो जंक्शन अपघाताचा सापळा ठरतोय. इथला रस्ता अरुंद असल्यामुळे वारंवार अपघात होत असतात. त्यात शनिवारच्या अपघाताची भर पडली. या धडकेत पर्वरीतील दोन युवक कंटेनरच्या टायरखाली गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेसंबंधी पोलिस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचाः संदीप वझरकर यांची जामिनावर सुटका