मदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा

लोकांना जीवनावश्यक सामग्री, पाणी तसंच इतर वस्तूंचा पुरवठा करून मदत केली

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः गोव्यातील अनेक भागात पूराने हाहाकार माजवून शेकडो घरांचं नुकसान केलं आहे. सावर्डे, सत्तरी, वाळपई, माशेल, होंडा, सावईवेरें तसंच इतर भागात लोकांचं भयंकर नुकसान झालं आहे. सरकारने ताबडतोब सर्व पूरग्रस्तांना रोख मदत आणि एक महिन्याची जीवनावश्यक सामग्री द्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली.

हेही वाचाः आर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी

काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा

विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर तसंच इतर पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने आज सावर्डे भागातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला आणि लोकांना जीवनावश्यक सामग्री, पाणी तसंच इतर वस्तूंचा पुरवठा करून मदत करण्याचा प्रयत्न केला.

ताबडतोब लोकांना रोख रक्कम देणं गरजेचं

सरकारने पाहणी अहवाल आणि इतर सरकारी सोपस्कारांची वाट न पाहता ताबडतोब लोकांना रोख रक्कम देणं गरजेचं आहे. लोकांचे कपडे, भांडी आणि इतर सर्व सामान पूरात वाहून गेलं आहे. काणकोण येथे पूर आला तेव्हा माझ्या सरकारने लोकांना रोख रक्कम देत दिलासा प्रयत्न केला होता. संकटकाळात लोकांना मदत देणं सरकारचं कर्तव्य आहे, असं कामत म्हणाले.

हेही वाचाः सरकार ऐकलं तर ठीक, नाहीतर आझाद मैदानावर जमून आंदोलन करावंच लागेल!

काँग्रेस आपलं मदत कार्य सुरूच ठेवणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सरकारने त्वरित लोकांना सर्व प्रकारची मदत करावी अशी मागणी केली. काल दिल्लीहून गोव्यात पोचल्यानंतर मी थेट सत्तरी तालुक्यात गेलो आणि युवक काँग्रेस मार्फत लोकांना मदत देण्याचे प्रयत्न केले. युवक काँग्रेस आपलं मदत कार्य सुरूच ठेवणार असल्याचं चोडणकर म्हणाले.

हेही वाचाः नशीब! रस्ता वाहून गेला तेव्हा कोणतं वाहन जात नव्हतं…

लोकांना मदत करणं आमची जबाबदारी

युवक काँग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी काल व आज पूरग्रस्त भागात जातीने उपस्थित राहून मदत कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. पूराने हाहाकार माजवला असून, लोकांना मदत करणं आमची जबाबदारी आहे, असं म्हार्दोळकरांनी सांगितलं.

हेही वाचाः CORONA UPDATE | शनिवारी कोविड मृतांची पाटी कोरी

काँग्रेसचे पदाधिकारी संकल्प आमोणकर, जनार्दन भांडारी, अर्चित नाईक, साईश आरोसकर, मनोहर नाईक तसेच गट समित्यांचे इतर पदाधिकारी या मदत कार्यात काल व आज सहभागी झाले होते.

हा व्हिडिओ पहाः Video | Politics | BJP Goa | जे पी नड्डा यांचं गोव्यात दणक्यात स्वागत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!