रविवारी साखळीत काँग्रेसची ‘सद्बुद्धी यात्रा’

काँग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोव्याचे सदोष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. भाजप त्यांच्यावर उपचार करण्याची शक्यता कमीच आहे. काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्याचे डोकं ठिकाणावर यावं आणि त्यांना त्यांच्या पदाच्या जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी रविवार १ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या साखळी येथिल निवासस्थानी ‘सद्बुद्धी यात्रा’ आयोजित केली असल्याची माहिती काँग्रेसचे माध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दिली.

हेही वाचाः कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या संमिश्र डोसबाबत चाचण्यांचा परवानगी द्या

‘सद्बुद्धी यात्रेचं नेतृत्व काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत करणार आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते मु्ख्यमंत्र्यांचं डोकं ठिकाणावर यावं म्हणून त्यांना फुलं भेट देणार आहे. त्यांना आपल्या पदाच्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून मेणबत्त्या पेटवणार आहेत, अशी माहिती पणजीकरांनी दिली.

हेही वाचाः जगात पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या लसींच्या कॉकटेलवर अभ्यास

काँग्रेसकडून ‘सद्बुद्धी यात्रेचं’ आयोजन

गोवा राज्याच्या भल्याचा विचार करुनच काँग्रेस पक्षाने शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने ‘सद्बुद्धी यात्रेचं’ आयोजन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीने वागणं आणि जनतेला सुरक्षा देणं ही सरकारची जबाबदारीच नव्हे, तर कर्तव्य असल्याची जाणीव डॉ. प्रमोद सावंताना करुन देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. लोकांनीच त्यांच्या सुरक्षेचे उपाय घ्यावेत असा सल्ला देणाऱ्या मुख्यमंत्री सावंताना पदावर राहण्याचा नैतिक अधिकारच नाही.

हेही वाचाः महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी संशयितास अटक

भाजपवाल्यांचं समुपदेशन गरजेचं

भाजप सरकारचे कायदा मंत्री निलेश काब्राल यांनी काही दिवसांपूर्वी नव दांपत्याना ‘समुपदेशन’ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. भाजप सरकारने मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री तसंच भाजपचे पदाधिकारी यांच्यासाठी त्यांच्या घटनात्मक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांची जाणीव करुन देण्यासाठी समुपदेशन करणं गरजेचं आहे. लोकांना सुरक्षितता देणं आणि लोकभावनांचा आदर करणं हे भाजपवाल्यांनी शिकणं गरजेचं आहे, असा टोला पणजीकरांनी हाणला आहे.

हेही वाचाः मायडा नदीत आढळला मृतदेह

जनतेची जाहीर माफी मागावी

गोव्यात झालेल्या दोन मुलींवरील बलात्कार प्रकरणांनंतर पालक आणि मुलांना जबाबदार धरणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी ताबडतोब जनतेची जाहीर माफी मागावी अशी आम्ही परत एकदा मागणी करतो. भाजप सरकार कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यास अपयशी ठरल्यानंच आता राज्यात बलात्कार, खून, गोळीबार असे प्रकार दिवसाढवळ्या घडू लागले आहेत.

हा व्हिडिओ पहाः Video | ASSEMBLY | कर्मचार्‍यांच्या टोप्या फेकल्या सभापतींच्या दिशेने

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!