काँग्रेस अध्यक्षांची पर्तगाळ मठाला भेट

श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या चातुर्मास व्रत स्विकार सोहळ्याला उपस्थिती लावली

Goan Varta Live | प्रतिनिधी

काणकोण/पर्तगाळीः गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शनिवारी श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ मठाला भेट देऊन श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या चातुर्मास व्रत स्विकार सोहळ्याला उपस्थिती लावली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे युवा नेते युरी आलेमांव, सरचिटणीस जनार्दन भांडारी, दया पागी तसंच काणकोण गट अध्यक्ष प्रलय भगत हजर होते.

हेही वाचाः ऑक्सिजन मृत्यूच्या मुद्द्यावर भाजप सरकार स्वतःच्याच खोट्या जाळ्यात अडकलं

श्री रामदेव वीरविठ्ठल तसंच श्रीमद् विद्याधीराजतीर्थ स्वामीजींच्या समाधींचं दर्शन घेऊन त्या सर्वांनी श्री विद्याधीश स्वामीजींकडून फल मंत्राक्षता घेतल्या. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामीजींनी सर्वांना आशीर्वाद देत, समाजासाठी निस्वार्थीपणे काम करण्याचा सल्ला दिला आणि लोकसेवेचं फळ नेहमी चांगलंच मिळतं, असं सांगितले.

पाचशे वर्षांचा इतिहास असलेल्या मठास भेट देऊन स्वामीजींचे आशीर्वाद घेणं माझं भाग्य आहे, असं गिरीश चोडणकर म्हणाले. माझ्या आयुष्यातला हा अविस्मरणीय दिवस असल्याचं युवा नेते युरी आलेमांव म्हणाले.

हेही वाचाः गोवा श्रमिक पत्रकार संघटनेतर्फे ‘गूज पत्रकार’ पुरस्कारांची घोषणा

मठ समितीचे उपाध्यक्ष आर आर कामत आणि सचिव अनील पै यांनी सर्वांचं स्वागत केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!