काँग्रेस पक्षाचे इंधन दरवाढी विरोधात धरणे आंदोलन

काँग्रेस विधीमंडळ गट नेते दिगंबर कामतांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः देशातील वाढत्या इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाने ११ जून रोजी देश पातळीवर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. याचाच भाग म्हणून गोवा प्रदेश काँग्रेस समितीतर्फे राज्यातील चाळीसही मतदारसंघातील विविध पेट्रोल पंपांवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत यांनी दिली.

हेही वाचाः भाजप याही वेळी अव्वल ; तब्बल 750 कोटींच्या राजकीय देणग्या !

गोव्यातील चाळीसही मतदारसंघातील गट समिती, दोन्ही जिल्हा काँग्रेस समिती, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवा दल आणि एनएसयुआय या इंधन दरवाढ विरोधी धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, आमदार, खासदार या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेणार आहेत, असं कामतांनी सांगितलं.

हेही वाचाः कोरोना संक्रमित बालकांसाठी नवी गाइडलाइन

भाजप सरकार लोकांना आर्थिक बोजाखाली ढकलतंय

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर अगदी खाली आलेले असताना, केंद्रीतील मोदी सरकारने देशातील पेट्रोल तसंच डिझेलचे दर शंभरीकडे नेले आहेत. गोव्यातही लवकरच इंधनाचे दर शंभर रुपये प्रती लिटर होणार आहेत. कोविड संकटात भाजप सरकार लोकांना सहाय्य करण्याचे सोडून त्यांना आर्थिक बोजाखाली ढकलत आहे, अशी टीका कामतांनी केली आहे.

हेही वाचाः माहिती खात्यातर्फे गोव्यातील ‘मान्सून आणि त्याची वैशिष्ट्ये’वर वेबिनार

मडगावात धरणे आंदोलन

मडगाव गट काँग्रेस समितीतर्फे नगरपालिका उद्यानाकडील पेट्रोल पंपावर उद्या ११ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता धरणे कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती गट अध्यक्ष गोपाळ नाईक यांनी दिली.

हेही वाचाः इंडोनेशियात विष्णूची सर्वात मोठी मूर्ती

जनतेला आवाहन

काँग्रेस पक्षाने जनतेचा आवाज बनून इंधन दरवाढीच्या विरोधात हे आंदोलन देश पातळीवर आयोजित केले आहे. लोकांनीही या आंदोलनात सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, अशी विनंती दिगंबर कामत यांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!