काँग्रेस पक्षाला बदलाची गरजः रेजिनाल्ड

व्हायरल ऑडिओ क्लिपवर भाष्य करताना केलं प्रतिपादन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः काँग्रेस पक्षाला बदलाची गरज आहे. जे लोक पक्षात राहूनच पक्षातील नेत्याबद्दल वाईट बोलतात त्यांची पक्षात राहण्याची लायकी नाही. अशा लोकांवर पक्षश्रेष्ठींनी तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पक्षाला जर का स्वतःचा स्वाभिमान जपायचा असेल, तर पक्षाशी बेईमान करणाऱ्यांना पक्षातून बेदखल करावं. संपूर्ण गोवा काँग्रेसची नव्याने पुर्नरचना झाली पाहिजे, अशी मागणी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केलीये. व्हायरल ऑडिओ क्लिपविषयी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केलं आहे.

हेही वाचाः ‘भारतीय पॅनोरमा’साठी प्रवेशिका भरण्याचं ‘ईफ्फी’चं आवाहन

घाणेरडं राजकारण करणाऱ्यांची पक्षात राहण्याची लायकी नाही

८ ऑगस्टल रोजी वायरल झालेली ती ऑडिओ क्लिप मी पूर्ण ऐकलेली नाही. पण जे थोडं फार ऐकलंय त्यावरून एवढंच सांगू इच्छितो की असं घाणेरडं राजकारण करणाऱ्यांची पक्षात राहण्याची लायकी नाही. जर पक्षाला स्वतःचं नाव राखायचं असेल, तर असं घाणेरडं राजकारण करणाऱ्यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. ही क्लिप डब असल्याचं म्हटलं जातंय. पण इतर नेत्यांंचं क्लिप का आलं नाही? असा सवाल रेजिनाल्ड यांनी उपस्थित केलाय.

… तर पक्ष लोकांच्या भावनांशी खेळतोय

जर ही साधी गोष्ट पक्षाच्या लक्षात येत नाही, तर या पक्षाला मत देणाऱ्या अनेकांच्या भावनांशी हा पक्ष खेळतोय असंच यावरून दिसतं. भाजप सत्तेत येण्यापूर्वी मी पक्षासाठी खूप काम केलंय. अजूनपर्यंत मी लोकांचे विषय पुढे आणतो. कारण मला लोकांविषयी प्रेम आहे. विरोधी पक्षात असलो म्हणून काय झालं, सत्ताधारी – विरोधी हा खेळ राजकारणात सुरूच असतो. पण या सगळ्यातून काम करत राहणं महत्त्वाचं असतं, असं रेजिनाल्ड म्हणालेत.

हेही वाचाः आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीचे दर घसरले! खरेदीची सुवर्णसंधी

काँग्रेसची पुनर्रचना होणं आवश्यक

आमच्याच नेत्यांच्या कार्यपद्धतीवर मला प्रश्न उपस्थित करायचे नाहीत. पण जे बरोबर आहे ते बरोबर आणि जे चूक ते चूक यावर मी ठाम आहे. गोव्यासाठी काही करायचं असेल तर गोवा काँग्रेसची पुनर्रचना होणं आवश्यक आहे. लोक आमच्यासोबत आहेत. पण असे वायरल ऑडिओ क्लिपसारखे प्रकार बघणं लोकांना आवडणारं नाही. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींना माझी विनंती आहे की या विषयात लक्ष घालून लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी. स्वतःचा स्वार्थ न पाहता गोंयकारांचा विचार करणाऱ्या नेतृत्वाची पक्षाला गरज आहे. आम्हाला सत्ता आणि पद नको, पण गोंयकारांचं भलं झालेलं हवं. नवी इनिंग सुरू करायची असेल तर काँग्रेस पक्षाला बदलाची गरज आहे. आपल्या फायद्यासाठी या पक्षातून त्या पक्षात माकड उड्या मारणाऱ्या नेत्यांची पक्षाला गरज नाही, पण असे नेते हवेत जे काही झालं तरी दुसऱ्या पक्षाचं सरकार सत्तेत येऊ देणार नाहीत.

हेही वाचाः गोव्याच्या रक्षणासाठी हेवेदावे सोडून एकत्र या: रेजिनाल्ड

नेमकं व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय होतं?

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कसा भ्रष्टाचार आणि सेटिंग करत आहेत, याबद्दल खुद्द पक्षाचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो सांगत असल्याचं भासवत एकच खळबळ उडाली होती. फक्त इथपर्यंत हे आरोप थांबले नाहीत. पुढे गिरीश चोडकरांनी लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी उमेदवार श्रीपाद नाईकांशी हातमिळवणी केल्याचाही आरोप करण्यात आला. तसंच मांद्रे पोटनिवडणुकीवेळी सचिन परब आणि रमाकांत खलपांना उमेदवारी नाकारतून मुद्दात कमजोर असलेल्या बाबी बागकरांनी उमेदवाली दिल्याचंही ऑडिओ क्लिपमध्ये आढळून आलंय. इतकंच काय तर चोडणकर आणि विरोधी पक्षनेते हे दोघंही मिळून सेटिंग करत असल्याचाही सनसनाटी आरोप या व्हायरल क्लिपमध्ये करण्यात आला होता. यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली.

हा व्हिडिओ पहाः Video | Sattari Landslide | जंगल तोडून अतिक्रमण केल्यामुळे डोंगर कोसळला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!