भाजप सरकारकडून सर्वसामान्यांची लूट; गेल्या सहा वर्षांत 300 टक्के लुटमार

गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकरांचा आरोप; महागाईविरोधात काँग्रेसची पणजीत निदर्शने

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसने आता दंड थोपाटलं आहे. महागाई विरोधात काँग्रेसने गुरुवारी पणजी काँग्रेस कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी इंधन दरवाढ, खाद्यतेल दरात वाढ तसंच जीवनावश्यक वस्तुंमध्ये दरवाढ बाबत भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचाः JOB ALERT | जीएमसीमध्ये नोकरीच्या संधी; लगेच अर्ज करा

काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चा

या मोर्चाला गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, उपाध्यक्ष तथा मोर्चा प्रमुख आल्तिन्हो गोम्स, महिला काँग्रेस प्रमुख बीना नाईक, युवा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर आणि दक्षिण गोवा प्रमुख ज्यो डायस यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाजप सरकारकडून सर्वसामान्यांची लूट

भाजप सरकारने सामान्य लोकांना लुटण्याचं कार्य सुरु केलं आहे. २०२२ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने इंधन दरवाढ, खाद्यतेल दरात वाढ, आणि जीवनावश्यक वस्तुंची दरवाढ करुन सुमारे २ लाख कोटी रुपये आपल्या खात्यात जमा केले आहेत. पेट्रोल आणि डिझल यांच्या करात वाढ करुन केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षात 300 टक्के लुटमार केली आहे. अशी माहिती गिरीष चोडणकर यांनी दिली.

हेही वाचाः देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प घट, कोरोनाबळी मात्र वाढले

महागाई कमी होत नाही तोपर्यंत अशाप्रकारचे मोर्चा सुरूच ठेवणार

राज्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरचे दर कमी होणं सोडा, पण दिवसेंदिवस ते वाढतच चाललेत. सामान्यांचं या महागाईत जगणं मुश्कील झालं आहे. सरकारला जनतेचं काहीच पडलेलं नाही. मात्र काँग्रेस नेहमीच सर्वसामान्यांच्या मागे आधार म्हणून राहीली आहे. आणि यापुढेही राहणार आहे. कोरोना काळात वाढलेल्या महागाईमुळे सर्व सामान्य त्रस्त झालेत. त्यामुळे सरकारने त्वरीत महागाई कमी करण्यावर भर द्यावा. जोपर्यंत महागाई कमी होत नाही तोपर्यंत अशाप्रकारचे मोर्चा सुरु राहणार आहे, असा इशारा चोडणकरांनी यावेळी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!