‘काँग्रेसला कुणाशीही युती करण्याची गरज नाही’

मिकी पाशेकोंचं युतीबाबत महत्त्वाचं वक्तव्य; काँग्रेस प्रवेशानंतर गोव्यात परतल्यावर विधान

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः एकीकडे गोवा फॉरवर्डने युतीसाठी घाई असल्याचं उघडपणे म्हटलंय. तर दुसरीकेड नुकतेच काँग्रेसमध्ये गेलेल्या मिकी पाशेको यांनी काँग्रेसला कुणाशीही युती करण्याची गरज नसल्याचं वक्तव्य केलंय. एकूणच काँग्रेस प्रवेशानंतर गोव्यात परतलेल्या मिकी पाशेको यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय.

हेही वाचाः ‘आरबीआय’ने नियम बदलले! वाचा सविस्तर

मिकी पाशेको हे रविवारी दिल्लीहून गोव्यात परतले. गोव्यात परतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस आगामी निवडणुकीसाठी कशी तयारीला लागली आहे, हे तर सांगितलंच. शिवाय युतीवरुन सुरु असलेल्या चर्चांवरही महत्त्वाचं विधान केलंय.

हेही वाचाः CRIME | मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला; नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा

काय म्हणालेत पाशेको?

जे काँग्रेस पक्षाकडे युतीसाठी विचारणा करताहेत, त्यांना स्वतःला राजकारणात टिकवून ठेवण्यासाठी युती झालेली हवीये. काँग्रेसला कुबड्यांची गरज नाही. हे जे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांंना निवडणूकांपूूर्वी राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि निवडणूकांनंतर सत्तेसाठी मोठ्या पक्षांसोबत युतीची आवश्यकता आहे. भाजप आणि काँग्रेस सोडून हे छोटे मोठे पक्ष मी मानत नाही, असं पाशेको म्हणालेत.

काँग्रेसला एकमताने निवडून आणूया

आज आमच्यासारख्या लोकांनी पाठिंबा देऊन काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याची गरज आहे. त्यामुळे मी समस्त गोंयकारांना आवाहन करतो, की त्यांनी एकमताने काँग्रेसला पाठिंबा द्यावा, आणि पुढील 5 वर्षांसाठी राज्यात काँग्रेसचं सरकार स्थापन करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलावा, असं आवाहन पाशेकोंनी गोंयकारांना केलंय.

हेही वाचाः विराट कोहलीची ‘ही’ रणनीती चुकीची

गांधी परिवारासोबत माझे चांगले संबंध

दिनेश गुंडू राव गोव्यात आले असता काँग्रेस प्रवेश न करता, दिल्लीत जाऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यामागचं गुपित उलगडताना पाशेको म्हणाले, नियमांचं पालन करणं मला महत्त्वाचं वाटलं. मी चार वेळा मंत्री राहिलोय त्यामुळे नियमांचं पालन करणं मी महत्त्वाचं मानतो. शिवाय गांधी परिवारासोबत माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळे गोव्यातील मी एकमेव राजकारणी आहे, ज्याने दिल्लीत जाऊन काँग्रेस प्रवेश केला आहे, असं पाशेको म्हणालेत.

हेही वाचाः येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता

कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी

मिकी पाशेको नक्की कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, याविषयीचे तर्क वितर्क काढले जातायत. मात्र कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं पाशेको म्हणालेत. मी काँग्रेस पक्षाचा सैनिक आहे. मला जिथे उभं राहा म्हणतील तिथे मी राहिन. 40 मतदारसंघांपैकी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. माझा स्वभाव गोव्यातील जनतेला माहीत आहे. मी 20 वर्षं आमदार राहिलोय. मी गोव्यातील एकमेव असा आमदार आहे, ज्यावर भ्राष्टाचाराचा कोणताही गुन्हा नोंद नाहीये. मी एक स्वच्छ राजकारणी आहे. कुठल्याही मतदारसंघातून मला उभं केलं तरी मी निवडून येईन. यापूर्वी मी 2 मतदारसंघातून निवडून आलोय. अजून निवडूकीला 6 महिन्यांचा अवधी आहे. काँग्रेसला 22-23 जागा आणून सरकार स्थापन करण्यासाठी केवळ 2 ते 3 महिने पुरेसे आहेत, असा विश्वास पाशेकोंनी बोलून दाखवलाय.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | MISSION 22 PLUS | भाजपचं २०२२साठी संघटनात्मक काम सुरू


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!