कोविडचा सामना करण्यात भाजप सरकार अपयशी

कॉंग्रेसचे नेते तुलिओ डिसोझांची सरकारवर टीका; कोविडबाबत अतिरिक्त सुविधांचा रोडमॅप तयार करण्याची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय सुविधांचा राज्यात अभाव असल्याने गोंयकार कोविड-१९ ला बळी पडत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते तुलिओ डिसोझा यांनी केला आहे. तसंच या क्षेत्रातील अतिरिक्त सुविधांचा रोडमॅप तयार करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

हेही वाचाः अरे देवा! गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट देशापेक्षाही जास्त

वैद्यकीय सुविधा देण्यात सरकार अपयशी

गुरुवारी पणजीतील काँग्रेस हाऊसमध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला पणजी ब्लॉकचे अध्यक्ष जोएल आंद्रे उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार कोरोना बाधितांना वैद्यकीय सुविधा देण्यात अपयशी ठरलंय. त्यामुळे लोक कोविडला बळी पडतायत, अशी घणाघाती टीका यावेळी सरकारवर तुलिओ डिसोझांनी केली.

हेही वाचाः ELECTIONS | दक्षिण गोव्यात नगरपालिका निवडणुकांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून कडक निर्बंध

सरकारकडून कोणतीच स्पष्टता नाही

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेल्या पावलांबद्दल सरकारकडून कोणतीही स्पष्टता दिली जात नाही. सरकार या परिस्थितीचा सामना करण्यात अपयशी ठरलं आहे. म्हणूनच आमचे गोंयकार कोविडला बळी पडत आहेत. प्रत्यक्षात सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली असल्याचा आरोप, डिसोझांनी केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केलेल्या संचारबंदीबाबत स्पष्टता देण्यात तसंच कोविड संबंधित प्रकरणांचा सामना करण्यासाठी अतिरिक्त सुविधा तयार करण्याचा रोडमॅप देण्यातही सरकारला अपयश आलंय. जसजसा कोविड बाधितांचा आकडा वाढतोय, तसतशा अतिरिक्त सुविधा निर्माण करण्याची गरज असल्याचं, डिसोझा म्हणाले.

हेही वाचाः CORONA VACCINATION | मी घेतली, तुम्ही कधी घेताय?

लोकांच्या दुःखाचा उत्सव करू नका

ऑक्सिजन खरेदी करण्यासाठी सरकारने काय केलंय आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी केंद्राच्या मदतीने कोणती पावलं उचलली जातायत हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. लोकांचं दुःख, वेदना आणि त्रासांचा सरकारने उत्सव बनवू नये. गोंयकार कोविडमुळे त्रास सहन करतायत हेच लसीकरण कार्यक्रमातून प्रतिबिंबीत होतंय आणि म्हणूनच भाजपने या कार्यक्रमाचं उत्सवात रूपांतर करून राजकीय लाभ मिळवू नये, अशी टीका डिसोझांनी केली.

हेही वाचाः पेडण्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

टॅक्सी तसंच विद्यार्थी आंदोलकांचा सरकारने आवाज दडपला

कोविडच्या निर्बंधांच्या बहाण्याने असंवेदनशील भाजप सरकारने राजधानीत आंदोलन करणाऱ्या टॅक्सी चालकांचा आणि बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, तथापि कॅसिनोच्या कामकाजावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. आपली आरोग्य यंत्रणा ढासळत चालली आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोणतीही उपकरणं, सुविधा नसल्यामुळे लोक मरत आहेत. कोविड-१९ चा सामना करण्याच्या सरकारच्या निष्काळजीपणाचा आणि सुस्त दृष्टिकोनाचा जोएल आंद्रेंनी यावेळी निषेध केला.

हेही वाचाः CORONA UPDATE | पुढील 24 तासात निर्णय

मुख्यमंत्री आपल्याच विधानांबद्दल स्पष्ट नाहीत

एकीकडे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे सांगतायत की, लॉकडाऊनमुळे कोविडची साखळी तोडण्यास मदत होणार नाही, तथापि दुसरीकडे लोकांना घराबाहेर न पडण्याची विनंती केली जातेय. मुख्यमंत्री आपल्या विधानांबद्दल स्पष्टता देण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोपही जोएल आंद्रेंनी मुख्यमंत्र्यांवर केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!