प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी संदेश खोर्जुवेकर

प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीकडून खोर्जुवेकरांच्या नावाची केंद्रीय ओबीसी विभागाकडे शिफारस

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: हणजूण- कायसूव ग्रामपंचायतीचे पंचायत सदस्य आणि शिवोली युवा काँग्रेस समितीने माजी अध्यक्ष संदेश नरहरी खोर्जुवेकर यांची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मान्यतेनंतर एआयसीसी ओबीसी विभागाने गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. जीपीसीसीचे उपाध्यक्ष एम.के.शेख यांनी याविषयी दिली आहे. प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीने त्यांच्या नावाची शिफारस केंद्रीय ओबीसी विभागाकडे केली होती.

हेही वाचाः ACCIDENT | धारबांदोड्यात महाराष्ट्र-गोवा टक्कर; एकजण जखमी

१९९९ पासून खोर्जुवेकर काँग्रेस पक्षाचे सदस्य

१९९९ पासून संदेश खोर्जुवेकर हे काँग्रेस पक्षाचे सदस्य असून ते विविध सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी आहेत. ओबीसी विभाग ही काँग्रेस पक्षाची प्रमुख संघटना आहे, ज्याची व्याप्ती गोव्यात 19 समुदायांमध्ये आहे ज्यात गोव्याच्या लोकसंख्येच्या जवळजवळ 30% लोकांचा समावेश आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता सर्व 19 समुदायांच्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांना काँग्रेसच्या जवळ आणणं हे नवीन अध्यक्षांसमोरील मुख्य आव्हान असेल.

हेही वाचाः सावंतवाडी नगराध्यक्षांसह भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

चोडणकर-कामतांनी केलं अभिनंदन

या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोध पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. खोर्जुवेकर यांच्या नेतृत्वाखाली मागास वर्गात पक्षाची संघटना मजबूत होईल, अशी प्रतिक्रिया चोडणकर यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!