काँग्रेसकडून नवीन मीडिया विभागाची नियुक्ती

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः काँग्रेस पक्षाने आज अमरनाथ पणजीकर यांच्यासमवेत गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष म्हणून आपल्या नवीन मीडिया विभागाची घोषणा केलीये. या विभागात ट्राजन डिमेलो यांना मीडिया पॅनेललिस्ट म्हणून बढती देण्यात आली आहे. इथून पुढे डिमेलो राष्ट्रीय माध्यमांशी समन्वय साधतील. सोमवारी जीपीसीसीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. अखिल भारतीय काँग्रेस समितीने मान्यता दिल्यानंतर ही नवीन मीडिया टीम घोषित केली जात असल्याचं ते यावेळी बोलताना म्हणाले.
अमरनाथ पणजीकर
आगामी निवडणूकांसाठी काँग्रेसची आक्रमक माध्यम रणनिती
आज जाहीर करण्यात आलेल्या माध्यम विभागात आर्किटेक्ट, पत्रकार, शिक्षक, डॉक्टर, वकील आणि इतरांचा समावेश आहे. नवनियुक्त सदस्य भाजपला शिंगावर घेऊन सरकारचा गैरकारभार उघड करणार आहेत. आगामी निवडणूकांसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक माध्यम रणनिती आखत असून, त्या दृष्टिने विचारविनीमय चालू झाल्याचं चोडणकरांनी सांगितलं.
हेही वाचाः हिंमत असेल तर महाराष्ट्र सरकारनं मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवावं !
मीडिया पॅनलिस्ट पद मिळवीण्याचा पहिला मान ट्राजन डिमेलोंना
काँग्रेस पक्षाच्या “एक व्यक्ती एक पद” तत्वानुसार माध्यम विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांच्याकडे आता सरचिटणीस पद राहणार नाही. नव्यानेच निर्माण केलेलं मीडिया पॅनलिस्ट हे पद मिळवीण्याचा पहिला मान ट्राजन डिमेलो यांना मिळाला आहे. आर्किटेक्ट तुलीयो डिसोजा हे काँग्रेसचे प्रवक्ते होते. नव्याने नेमणूक करण्यात आलेल्यात ज्येष्ठ पत्रकार महादेव खांडेकर, ॲड श्रीनिवास खलप, डॉ. आशिश कामत, ॲल्टन डिकॉस्ता आणि शिक्षीका पल्लवी भगत यांचा समावेश आहे.
ट्राजन डिमेलो
भाजप सरकारचा गैरकारभार उघड करणार
काँग्रेस पक्षाने मागील आठवड्यात समाज माध्यम प्रमुखपदी हिमांशू तिवरेकर यांची नियूक्ती केली होती. त्यानंतर इंधन दरवाढी विरूद्ध काँग्रेसने केलेल्या आंदोलनात काँग्रेस पक्षाला समाज माध्यमांवर प्रचंड प्रतिसाद मिळाला अशी माहिती चोडणकरांनी दिली. आज नव्याने नियुक्त झालेले सर्व प्रवक्ते काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे पुढे नेत असतानाच, भाजप सरकारचा गैरकारभार उघड करणार असल्याचा विश्वास चोडणकरांनी व्यक्त केला.
हेही वाचाः चिकनची मागणी घटली; लॉकडाऊनमुळे राज्याला चिकन पुरवणाऱ्या व्यावसायिकांचं नुकसान
माझ्याकडून संपूर्ण सहकार्य
राजकीय पक्षाचा माध्यम विभाग हा महत्त्वाची भूमीका बजावतो. माध्यम विभागाच्या कामगिरीवरुनच पक्षाचा प्रभाव वाढतो. नवीन माध्यम विभागाला माझ्याकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असं काँग्रेस विधिमंडळ गट नेते दिगंबर कामतांनी म्हटलंय.