मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

सात तरुणांना १४ दिवसांची कोठडी

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शिरोडा मतदारसंघातील दौऱ्यावेळी जाहीर कार्यक्रमात भाषण सुरू असताना गोंधळ घातल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’च्या सात तरुणांना शनिवारी अटक केली होती. या सातही तरुणांविरोधात गुन्हा नोंद करून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, अशी माहिती फोंड्याचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांनी रविवारी दिली.

हेही वाचाः काणकोणात २४ तासांत ७ इंच पाऊस

सात तरुणांना १४ दिवसांची कोठडी

कोठडीत असलेल्या तरुणांमध्ये सचिन गावडे (३०, बोरी), राहुल नाईक (३५, देऊळवाडा-बोरी), निकी आलेमाव (२६ तरवळे, शिरोडा), शैलेश नाईक (३८, वाजें-शिरोडा), प्रज्योत गावकर (३०, कोटवाडा-बेतोडा), योगेश नाईक (३०, तोर्ल-शिरोडा), एलिओट गुदिन्हो (३४, पंडगाळ, शिरोडा) यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात भा.दं.सं. १४३, १४७, १४९,९८६, ३५३ व ५०९ कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.

शिरोडा मतदारसंघाच्या दौऱ्यावर गोंधळ

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवारी शिरोडा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना वरील प्रकार घडला. शिरोडा पंचायतीजवळ त्यांचा जाहीर कार्यक्रम सुरू होता. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी भूमी अधिकारिणी विधेयक, शिरोड्यातील खराब रस्त्यांविषयी प्रश्न विचारून गोंधळ घातला. दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी त्यांना अनेकदा शांत राहण्याची विनंती केली. तसेच, विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तरेही देण्याचा प्रयत्न केला. शेवटी तरुण ऐकत नसल्याचे दिसल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना लेखी प्रश्न कार्यालयात पाठवण्याची सूचना केली. मात्र, त्या तरुणांनी मुख्यमंत्री आपल्या वाहनाकडे जात असताना पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली. तसेच मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध केला. या घटनेनंतर पोलिसांनी सर्व तरुणांना अटक केली आहे.

हेही वाचाः आयएनएस हंसाने साजरा केला हीरक महोत्सव

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. सावंत आपल्या मतदारसंघात येऊन आपले प्रश्न व समस्या ऐकून घ्यायला तयार होत नाहीत, असा आरोप या तरुणांनी केला आहे.

हा व्हिडिओ पहाः DOG ATTACK | कुत्र्यांकडून 20 पेक्षा अधिक चावे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!