अधिवेशनात म्हादईवरुन घमासान! खंवटे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी

प्रश्न-उत्तराच्या तासात जोरदार बाचाबाची

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी सरकारला धारेवर धरणारे प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विचारलेले प्रश्न वेगळेच होते आणि सरकारकडून देण्यात येणारी उत्तरं भलतीच असल्यानं या रोहन खंवटे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली.

हा व्हिडिओ पहाः Video | GOVERNOR | MHADEI | म्हादई वादाचा अभ्यास करणार : राज्यपाल पिल्लई

हेही वाचाः म्हादईप्रश्न पंतप्रधानांकडे घेऊन चला, विरोधीपक्षाची मागणी

म्हादईची सध्याची स्थिती काय आहे? किती प्रमाणात म्हादईचं पाणी वळवण्यात आलं आहे? क्षारता चाचणीचं काय झालंय? या सर्व प्रश्नांवरुन रोहन खवटेंनी सवाल उपस्थित केले होते. यावर उत्तर देताना प्रश्नाला टाळून भलती-सलती माहिती देत प्रश्नाला उत्तर देण्यात टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

हेही वाचाः म्हादईच्या पाण्याची आज अभियंत्यांकडून पाहणी

हेही वाचाः म्हादई : राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेचे पथक गोव्यात, आज नमुने गोळा करणार

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हे सर्व प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे असल्याचं म्हणत जोरदार प्रत्युत्तरही दिलं. सरकारनं म्हादईबाबत आग्रही भूमिका घेतल्याचंही त्यांनी ठासून सांगितलंय. मात्र त्यानंतरही रोहन खंवटे आणि मुख्यमंत्री यांच्यात जोरदार खडाजंगी झालं. अखेर यानंतर विजय सरदेसाईंनीही रोहन खंवटे यांच्या प्रश्नाचा आधार घेत सरकारवर हल्लाबोल केला.

हा व्हिडिओ पहाः Updates | अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार तेजीत आणि राज्यात म्हादईचं राजकारण पेटणार

दरम्यान कर्नाटकात भाजचं सरकार येण्यासाठी गोवा सरकारनं म्हादई विकली असल्याचा आरोप विजय सरदेसाईंनी केला. तसंच म्हादईच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना ‘फिक्स’ केलंय, असा खळबळजनक दावा सरदेसाईंकडून करण्यात आलाय.

हा व्हिडिओ पहाः Video | Flood effect 2021 | Bardes | बार्देशमध्ये तब्बल ३८ लाख रुपयांचं नुकसान

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!