जमीन हडप प्रकरणातल्या संशयिताला सशर्त जामीन…

विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : बनावट दस्तावेज​ तयार करून जमिनी हडप करण्याच्या प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी)  पुरातत्त्व खात्याचे कर्मचारी शिवानंद मडकईकर या संशयिताला अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या मडकईकरला ४० हजार रुपयांच्या व इतर अटीवर म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा निवाडा न्या. आश्विनी खांदोळकर यांनी मंगळवारी जारी केला आहे. 
हेही वाचा:बनावट विक्री कागदपत्रे करून फसवलं बँकेला… ‍

‘एसआयटी’ची कारवाई

राज्य सरकारने बनावट दस्तावेज तयार करून बेकायदेशीर पद्धतीने जमिनी हडप करून त्यांची विक्री करणाऱ्यांची कसून चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. क्राईम ब्रांचचे अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या या पथकात सात जणांचा समावेश आहे. त्यानंतर एसआयटीने पणजी पोलीस स्थानकात गोंगुरे, आसगाव – बार्देश येथील सर्वे क्रमांक ३३/३ मधील जमीन हडप केल्याप्रकरणी दाखल तक्रारीची दखल घेऊन पुराभिलेख खात्याचे माजी संचालक, जमीन बळकावल्याच्या कालावधीत बार्देशमध्ये असलेले तत्कालीन मामलेदार व बार्देशचे तत्कालीन सब रजिस्ट्रार यांच्यासह दुर्भाट फोंडा येथील लुईझा फर्नांडिस, आयतानो फर्नांडिस, मीना रमाकांत नाईक व इतरांवर गुन्हा नोंद केला. या प्रकरणात पथकाने १८ रोजी घोगळ – मडगाव येथील विक्रांत शेट्टी याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. दरम्यान, त्याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला. 
हेही वाचा:उच्च न्यायालयाचा सरकारला झटका! ‍

महम्मद सुहैल शफी याला अटक

एसआयटीने मंगळवारी सांतिनेझ येथील आणि मूळ चित्रदुर्ग (कर्नाटक) येथील महम्मद सुहैल शफी याला अटक केली होती. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. एसआयटीने प्रथमच या प्रकरणात पुरातत्व खात्यातील जमिनींच्या कागदपत्रांच्या खंडांत फेरफार करून त्यात बनावट दस्तावेज घुसडणाऱ्या खात्यातीलच धीरेश नाईक (रा. बांदोडा – फोंडा) याला अटक केली. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एसआयटीने शनिवारी पुरातत्व खात्यातील दुसरा कर्मचारी शिवानंद मडकईकर (रा. मडकई – फोंडा) याला अटक केली.
हेही वाचा:UPDATES | दुपारच्या ठळक घडामोडी… ‍

अर्जावर बुधवारी सुनावणी होणार

या प्रकरणातील संशयित विक्रांत शेट्टी याच्यासह इतर ठिकाणी जमीन खरेदी केलेल्या नरेश सातर्डेकर याने म्हापसा येथील अतिरिक्त उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे.  एसआयटीने अटक केलेला मुख्य सूत्रधार महम्मद सुहैल शफी, पुरातत्त्व खात्याचा कर्मचारी धीरेश नाईक या दोघांनी दाखल केलेल्या जामिनावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने बुधवारी निवाडा राखीव ठेवला आहे.
हेही वाचा:पीडब्ल्यूडीतील भरती प्रक्रिया ‘रद्द’…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!