हळदोणात चित्रपट चित्रीकरणास कोमुनिदादचा विरोध

वळावली कोमुनिदाद मनोरंजन सोसायटीकडे तक्रार करणार

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: वळावली हळदोण येथे वळावली कोमुनिदादच्या जागेत विना परवानगी सुरू असलेले चित्रपटाच्या चित्रीकरणास कोमुनिदादने हरकत घेतली आहे. या बेकायदा प्रकाराविरूद्ध सरकारच्या मनोरंजन सोसायटीकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय कोमुनिदाद समितीने घेतला आहे.

हेही वाचाः चिखली येथे रेती उत्खनन; गुन्हा दाखल

वळावली कोमुनिदादच्या खुल्या जागेत चित्रपटाचे चित्रीकरण सुरू

गाळवार हळदोण येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील बाजूस वळावली कोमुनिदादच्या खुल्या जागेत एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असल्याची माहिती बुधवारी सकाळी मिळताच कोमुनिदादचे अध्यक्ष ऑल्ड्रीन परेरा यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहनाचा ताफा होतो. तसंच चित्रपटाच्या चित्रीकरणाची तयारी सुरू होती. तेथे उपस्थित लोकांना परेरा यांनी या बेकायदा घुसखोरी आणि परवान्याबद्दल जाबा विचारला. पण धान्वी थिवी येथील फोकस फिल्स इंटरटेनमेन्ट नामक आस्थापना मार्फत येथे चित्रीकरणाचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याबरोबर परेरा यांनी हळदोण पोलिस चौकीवरील पोलिसांमार्फत हे चित्रकारण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण संबंधींतांनी पोलिसांचंदेखील ऐकून घेतलं नाही आणि चित्रीकरण सुरूच ठेवलं. वरील आस्थापनाच्या मालकांनी देखील पोलिसांना दाद दिली नाही.

मनोरंजन सोसायटीकडे तक्रार करणार

 कोमुनिदादच्या वतीने आपल्या मालमत्तेत घुसखोरी करून अज्ञातांकडून चित्रपटाचे चित्रीकरण केले जात असल्याची तक्रार पोलिसांत परेरा यांनी दिली आहे. तसंच या बेकायदा प्रकार खपवून घेतलं जाणार नाही. गुरूवारी आपण गोवा मनोरंजन सोसायटीकडे या विषयी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती ऑल्ड्रीन परेरा यांनी दिली आहे.

हा व्हिडिओ पहाः MGP OFFICE IN MORJIM | मांद्रे मतदारसंघात मोरजी इथं मगो कार्यालयाचं उद्घाटन

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!