प्रियोळ, शिरोड्यात विजयाची पूर्ण खात्री: मनोज परब

प्रियोळ व शिरोडा रेव्होल्यूशनरी गोवन्सच्या कार्यालयांची उद्घाटने

Goan Varta Live | प्रतिनिधी

शिरोडा: शिरोडा मतदारसंघातील लोकांचा दिवसेंदिवस वाढता पाठिंबा आणि रेव्होल्यूशनरी गोवन्सचे (आरजी) क्रांतिकारी युवक घेत असलेले परिश्रम पाहता येत्या २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आरजीचा उमेदवार १०० टक्के विजयी होणार याची खात्री आहे, असं प्रतिपादन आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी केलं. रविवारी १५ ऑगस्ट रोजी ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिरोडा येथे आरजीच्या कार्यालय उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचाः सिध्दी नाईक प्रकरणाची नव्याने चौकशी करा

शिरोडा मतदारसंघाचा विकास साधण्यात आमदार अपयशी

शिरोडा मतदारसंघात सर्वांगिण विकास साधण्यात माजी तसंच आताचे (दोन्ही) आमदार अपयशी ठरले आहेत. गोव्यात गोंयकारांचं हीत सांभाळण्यासाठी आणि गोव्याचं रक्षण करण्यासाठी आरजीशिवाय पर्याय नाही असा विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आहे, असं परब म्हणाले.

हेही वाचाः CORONA UPDATE | चिंता वाढली! कोविड मृतांचा आकडा वाढला

शिरोड्यात ‘आरजी’च

शिरोड्यात ‘आप’चे जेमतेम कार्यकर्ते आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत शिरोड्यात भाजपला १५ ते २० टक्केच मते मिळतील. आरजीचा उमेदवार शिरोडा मतदारसंघात पूर्ण आघाडी घेऊन जिंकेल हे नक्की. येथील क्रांतिकारी युवकांना राजकीय व्यक्तीकडून धमक्या दिल्या जातात. दबाव तंत्र वापरलं जातं. मात्र शिरोड्यातील क्रांतिकारी युवक संघटीत आणि एकजूट आहेत. हे पाहून येथील आमदाराच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, असं परब म्हणाले.

लोकांच्या समस्यांवर तोडगा काढणं आरजीचं मुख्य ध्येय

‘घर घर संपर्क’ अभियानात क्रांतिकारक युवकांना चांगला पाठिंबा आणि सहकार्य लोकांकडून मिळालं. आरजीच्या शिरोडा गटात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग सहभागी होत आहे. हे प्रेरणा स्थान आहे. लोक इथे कार्यालयात येऊन आपल्या समस्या मांडू शकतात. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढणं हे आरजीचं मुख्य ध्येय आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आरजीचा जाहीरनामा हा लोकाभिमुख असेल, असं परब म्हणाले.

हेही वाचाः जातीभेद न मानणाऱ्या मगो पक्षाला साथ द्या

देणग्यांच्या स्वरूपात मदत करा

शिरोडा मतदारसंघात आरजीच्या कार्यात ज्यांना प्रत्यक्षपणे सहभागी होता येत नाही, त्यांनी आर्थिक किंवा वस्तूंच्या रूपाने देणग्या देऊन सहभागी व्हावं. क्रांतीचा लढा अंतिम टप्प्यात पोचला आहे. विविध प्रकारच्या कामांसाठी आर्थिक खर्च येतो. सध्या क्रांतिकारक युवक आपल्याकडील असलेला जेमतेम पैसा त्यासाठी खर्च करत आहेत. देणग्यांच्या स्वरूपात मदत करू इच्छिणाऱ्या शिरोडा मतदारसंघातील लोकांनी शैलेश नाईक (८४५९२५९११०) किंवा राहुल (९७३०९१३८३५) यांच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन परबांनी केलंय.

हेही वाचाः पेडणे वाहतूक सहाय्यक अधिकारी वसूल करतात खंडणी

दरम्यान, प्रियोळ भागात आरजीचं दुसरं कार्यालय सुरू करण्यात आलं.

हा व्हिडिओ पहाः Shocking Accident | CCTV | ….म्हणून रस्ता ओलांडताना नेहमी सतर्क राहावं


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!