नुकसान भरपाई द्या; अन्यथा न्यायालयात जाऊ

पेडणे भाजप मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस यांचा जीएमआर कंपनीला इशारा

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गेल्या महिन्याच्या 15 मे रोजी आलेल्या चक्री वादळामुळे वारखंड, नागझर, चांदेल-हसापूर, उगवे-मोपा आणि कासारवर्णे या ग्रामपंचायतींमधील शेतकऱ्यांचं, त्यांच्या काजू-बागायती-कुळागरांचं नुकसान झालं आहे. याला पूर्ण जबाबदार विमानतळ बांधण्याचं कंत्राट मिळालेली कंपनी आहे. शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान सरकारने, कंत्राटदार कंपनीने किंवा विमानतळ प्राधिकरणने भरून द्यावं. अन्नथा आम्ही न्यायालयीन कारवाही करणार, असा इशारा चांदेल हसपूरचे पंच तथा पेडणे भाजप मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस यांनी दिलाय.

हेही वाचाः महाविद्यालयीन परीक्षांच्या तारखा विद्यापीठाकडून जाहीर

उपजिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसान भरपाईसाठी निवेदन

वारखंड-नागझर, चांदेल- हसापूर, उगवे -मोपा आणि कासारवर्णे ग्रामपंचायतीचे पंच, उपसरपंच तसंच सरपंचांनी मिळून पेडणेचे उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर यांच्याकडे नुकसान भरपाईचं निवेदन सादर केलं. तसंच उपजिल्हाधिकाऱ्यांसोबत याविषयावर तासभर चर्चा केली. यावेळी वारखंड-नागझरचे सरपंच संजय तुळसकर, पंच मंदार परब, चांदेल पंचायतीचे उपसरपंच शाम नाईक, शशिकांत महाले, निखिल महाले उपस्थित होते.

हेहीः काँग्रेस पक्षाचे इंधन दरवाढी विरोधात धरणे आंदोलन

शेतकऱ्यांचं नुकसान

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम घेतलेली कंत्राटदार कंपनी जीएमआर, या कंपनीच्या हलगर्जीपणामुळे आणि योग्य नियोजन नसल्यामुळे 15 तारखेला जे वादळ झालं, त्यात  वारखंड-नागझर, चांदेल- हसापूर, उगवे-मोपा आणि कासारवर्णे या ग्रामपंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं. गावातील पारंपरिक पाण्याच्या वाटा, गावातील तळ्याची दुर्दशा झाली, लोकांच्या घरात पाणी शिरलं, काजू-बागायती-कुळगरं नष्ट झाली. या संदर्भात मोपा प्राधिकरण आणि जएमआर कंपनीकडे लेखी निवेदने दिलं आहे. मात्र जीएमआर कंपनीने या संदर्भाता कानामनावर घेतलेलं नाही, असं गावस म्हणाले.

हेही वाचाः Vaccine सर्टिफिकेटवर झाली असेल चूक, तर घाबरू नका…

स्वतः येऊन झालेलं नुकसान पहा

काजू लागवड करणारे शेतकरी बाजूच्या बांदा गावात जाऊन काजू विकतात. तेथील सावकाराकडून आर्थिक मदत आगाऊ आणतात. या वर्षी शेतकऱ्यांना नुकसान झाल्यामुळे त्या शेतकऱ्याचं पुढे कसं होईल देवच जाणे. मोपा विमानतळ कंपनी जीएमआर, यांनी स्वतः या ठिकाणी येऊन आमचं किती नुकसान झालंय हे पहावं आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शशिकांत महालेंनी केलीये.

तळी-विहिरीतील पाणी दूषित

गावात असलेली पारंपरिक तळी, झरे, ओहळ, विहिरी आज नष्ट झाल्यात. पठारावरील लाल मातीचा थर विहिरीत, तळीत, शिरल्याने पाणी दूषित झालंय. गावची नैसर्गिक संपत्ती संपुष्टात आलीये. याला जबाबदार मोपा प्राधकारण तसंच जीएमआर कंपनी आहे. चारही ग्रामपंचायतींनी मिळून पुढील कारवाई करण्याअगोदर यावर उपाय योजना करणं गरजेचं आहे, असं पंच मंदार परब म्हणाले.

हेही वाचाः भाजप याही वेळी अव्वल ; तब्बल 750 कोटींच्या राजकीय देणग्या !

नुकसान कसं भरून काढणार?

उपजिल्हाधिकारी निपाणीकर यांच्याकडे आम्ही शेकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचं पुढे काय? कशा प्रकारे उपाययोजना करणार? नुकसान कसं भरून काढणार? येणाऱ्या पावसाळ्यात कशा प्रकारे नियोजन करणार? यासाठी एकत्रित निवेदन दिलं आहे. शुक्रवारी उत्तर गोवा जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, मुख्यमंत्री, विमानतळ प्राधिकरण यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती तुळशीदास गावस यांनी दिली.  

हेही वाचाः कोरोना संक्रमित बालकांसाठी नवी गाइडलाइन

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार

माणुसकीच्या दृष्टीने पारंपरिक निसर्ग सौंदर्याचं नुकसान करणं योग्य नव्हे. जीएमआर कंपनीच्या संबंधिक अधिकाऱ्यांना बोलावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची तजवीज करणार, आणि तसं न केल्यास त्यावर योग्य कारवाही करणार आणि शेतकऱ्यांनाया न्याय देण्याचा प्रयत्न करणार, असं उपजिल्हाधिकारी रविशंकर निपाणीकर यांनी म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!