एटीएस कमांडो जयदेव सावंत सेवेत दाखल

8 डिसेंबर रोजी बनावट स्फोटात झाले होते जखमी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राष्ट्रीय सुरक्षा गार्डची (एनएसजी) कवायती सुरू असताना बनावट स्फोटात दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस)चे कमांडो जयदेव सावंत जखमी झाले होते. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर तब्बल 6 महिन्यांनी सोमवारी कमांडो जयदेव सावंत सेवेत दाखल झाले. सेवेत दाखल झाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर, पोलिस निरीक्षक राया नाईक आणि इतरांनी त्याचं स्वागत केलं.

हेही वाचाः कोरोना रुग्णवाढ 1 लाखाच्या आत! 66 दिवसानंतर पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण

नक्की काय झालं होतं?

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन ‘सुपर स्पेशालिटी’ विभागाजवळ 8 डिसेंबर 2020 च्या दिवशी सकाळी ‘ग्रेनेड’ स्फोटाचा ‘मॉक ड्रिल’ (रंगीत तालिम) करताना गोवा पोलिसांच्या आतंकवादविरोधी पथकातील पोलीस हवालदार जयदेव सावंत जखमी झाले. ‘ग्रेनेड’ स्फोटामध्ये पोलीस हवालदार जयदेव सावंत यांच्या उजव्या पायाचे हाड मोडल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली.

हेही वाचाः गोव्यात अनलॉक प्रक्रिया कधीपासून? मुख्यमंत्र्यांनी सांगितली ‘ही’ तारीख

अचानक झालेल्या स्फोटामुळे सावंत झाले होते जखमी

मॉक ड्रील दरम्यान बनावट आतंकवाद्यांचा तसंच बनावट बाँबचा वापर केला जातो. बनावट बाँबमध्ये सन ग्रेनेडचा वापर केलो जातो. या बाँबमधून केवळ आवाज होत असतो. गोमेकॉत मॉक ड्रीलमध्ये बनावट बाँब शोधून काढण्याचं आवाहन पोलिसांसमोर होतं. त्याचदरम्यान बाँबचा स्फोट झाला. त्याच्या समोर अचानकपणे झालेल्या स्फोटामुळे जयदेव सावंत खाली पडले आणि त्यांच्या पायाला जखम झाली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!