खळबळजनक! धारगळमधील बेकायदा जमीन व्यवहाराचा लवकरच पंचनामा

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
ब्युरो : गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने अलिकडेच मंजूर केलेल्या 7 प्रस्तावांत धारगळ येथील पंचतारांकित प्रस्तावाचा समावेश आहे. डेल्टा प्लेजर कॉर्प कंपनी, जी राज्यात कॅसिनो व्यवसाय चालवते त्या कंपनीकडून धारगळ येथे 4 लाख 27 हजार 50 चौरस मीटर जागेत हे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांतून 4 हजार रोजगार निर्मिती होईल,अशी हमी कंपनीने सरकारला दिली आहे. प्रस्ताविक मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे कंपनीकडून ही जागा खरेदी करताना त्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा व्यवहार झाल्याची गोष्ट समोर आली आहे. या जमिनीपैकी काही भाग चुकीचे वारसदार दाखवून आपल्या नावे करून विकली आहे तर काही सरकारी जमीनच हडप करून गैरमार्गाने या कंपनीला विकल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या जमिन व्यवहारात विद्यमान सरकारातील काही मंत्री आणि त्यांचे लागेबांधे असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
या एकूणच प्रकरणी गोवन वार्ता लाइव्हचे इन्वेस्टीगेशन सुरू असून लवकरच या एकूणच प्रकल्पाचा पंचनामा सादर केला जाईल. या प्रकल्पांत नेमकं काय काय असणार आहे, त्यावरही एक नजर टाकुयात.
प्रकल्पात काय?
1 पंचतारांकित पाच हॉटेल्स
2 कन्वेन्शन सेंटर
3 मल्टीप्लेक्स सिनेमा
4 रिटेल एरिया
5 इलेक्ट्रॉनिक कॅसिनो
6 वॉटर पार्क
7 बॅन्कवेट सुविधा
8 चिल्ड्रन्स इंटरटेर्नसमेंट एरिया यांचा समावेश आहे.
या प्रस्तावात नमूद केलेली जमीन अधिकतर शेतजमिन आहे तर बहुतांश जमीन ही तिळारी पाटबंधारे अंतर्गत ओलीत क्षेत्रातील आहे, अशी माहितीही समोर आली आहे. डेल्टा कॉर्प ही जयदेव मोदी यांची कंपनी आहे. भारतातील कॅसिनो उद्योग जगताचे ते किंग समजले जातात.
पाहा पंचनामा –
पंचनामा | खरंच अल्वारा जमीन सरकारच्या मालकीची?
Special Report | कांद्याचा वांदा, भाज्या महागल्या? सामान्यांनी आता खायचं काय?