कोलवाळ पोलिस स्थानकाचा मार्ग मोकळा

करासवाडा येथे जलस्त्रोत खात्याची इमारत सज्ज

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः सरकारने मंजुरी दिल्याप्रमाणे कोलवाळ पोलिस स्थानक करासवाडा येथील जलस्त्रोत खात्याच्या इमारतीत थाटण्यात येणार आहे. चालू महिन्यात पोलिस स्थानक कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिस खात्याने जलद तयारीसह इमारत सज्ज ठेवली आहे.  

हेही वाचाः CRIME | हणजुण येथे ड्रग्स प्रकरणी एकास अटक

करासवाडा येथे जलस्त्रोत खात्याची इमारत सज्ज

2019 मध्ये सरकारने थिवी मतदारसंघासाठी कोलवाळ येथे बार्देश तालुक्यातील नवीन पोलिस स्थानकाला मंजूरी दिली होती. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या पोलिस स्थानकासाठी पर्यायी जागेची शोधाशोध खात्याने चालविली होती. सुरुवातील कोलवाळमध्येच भुखंड संपादीत करून त्यात इमारत उभारावी असा प्रस्ताव होता. पण इमारतीच्या बांधकामाला एक दोन वर्षांचा अवधी लागणार होता. या भुखंडाचे काम होईपर्यंत सरकारच्या विना वापर असलेल्या इमारतींमध्ये पोलिस स्थानकाचं कामकाज सुरू करण्याचं ठरलं. त्यानुसार जागेची शोधाशोध सुरू झाली. सुरुवातीला कोलवाळ गृहनिर्माण वसाहतीमधील नव्या इमारतीचा प्रस्ताव होता. पण नंतर करासवाडा येथे जलस्त्रोत खात्याची विनावापर असलेल्या इमारतीत पोलिस स्थानक स्थापन करण्यावर मोहर बसविण्यात आला.

हेही वाचाः VIRAL VIDEO | पक्ष्याने बांधलं एका पानावर घरटं, व्हिडीओ एकदा पाहाच

पोलिस खात्याकडे इमारतीचं हस्तांतरण

जलस्त्रोत खात्याने पोलिस स्थानक सुरू करण्यासाठी सदर इमारत पोलिस खात्याकडे हस्तांतरित केली. तसंच इमारतीचा ताबा म्हापसा पोलिसांकडे दिला आहे. इमारतीची साफसफाई आणि रंगरंगोटीचं काम करण्यात आलं आहे. शिवाय पोलिस स्थानकासाठी लागणारं फर्निचर देखील पोलिस खात्याने उपलब्ध करवलं आहे. वीज व पाणी जोडणीची प्रक्रिया सुरू असून काही दिवसांत या सुविधाही इमारतीला मिळतील.

हेही वाचाः तरंगत्या जेटीवरून मच्छिमार बांधवांची सेवा की राजकीय स्वार्थ?

कनिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना

शनिवारी दुपारी पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी या इमारतीची पाहाणी केली आणि कामाचा आढावा घेतला. येथे लवकरात लवकर पोलिस स्थानक सुरू करण्यात येणार असून त्या दृष्टीने आवश्यक सुविधा निर्माण केल्या जाव्यात, असे निर्देश त्यांनी कनिष्ठ अधिकार्‍यांना दिले. यावेळी पोलिस महानिरीक्षक राजेश कुमार, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबीत सक्सेना आणि म्हापसा पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर उपस्थित होते.

हेही वाचाः डिचोली सेसा कामगारांनी घेतली सभापतींची भेट

अधिसूचना जारी केल्यानंतर लोकार्पण

या पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात थिवी मतदारसंघातील संपूर्ण भागाचा समावेश केला जाईल. यासंबंधित अधिसूचना सरकारने जारी केल्यानंतर पोलिस स्थानकाचे लोकार्पण होईल, अशी माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!