तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कुणाची…

डॉ. प्रमोद सावंतांच्या मुख्यमंत्रिपदास शुक्रवारी दोन वर्षं पूर्ण; पत्नी सुलक्षणा सावंतकडून मुख्यमंत्र्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची दोन वर्षं पूर्ण केली. १९ मार्च २०१९ मध्ये त्यांनी गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंतांकडून फेसबुकवर त्यांचं खास अभिनंदन करण्यात आलंय.

डॉ. प्रमोद सावंतांचं अभिनंदन करताना सुलक्षणा सावंतांनी लिहिलंय,

खूप धाडस लागतं राज्याची धुरा समर्थपणे सांभाळायला… अनेक धाडसी निर्णय घ्यावे लागतात… काहींना ते आवडतात तर काहींना नाही… प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असेल पण तुम्ही खचला नाहीत… अनेक संकटांना तुम्ही सामोरे गेलात… नेहमीच नव्या उमेदीने काम करताना तुम्हाला कार्यकर्त्याच्या नजरेने बघते… तुम्ही शपथ घेतल्यानंतरचं तुमचं पहिलं वाक्य, ‘आमच्यावर गोवा राज्याची जबाबदारी आहे, खूप काम करायचं आहे…’

डॉक्टर तुम्ही एक उत्तम राजकारणी आहात, पण तुमचे राजकीय गुरू, कै. मनोहर भाईंचा आदर्श घेऊन एक उत्तम लोकनेता म्हणून घडलात, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे…. आमचे डॉक्टर… आमचे मुख्यमंत्री

मन शुद्ध तुझं, गोष्ट आहे पृथ्वी मोलाची…
तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कुणाची… पर्वाबी कुणाची…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!