चुकीला माफी नाही! कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

मुख्यमंत्र्यांनी दिला निर्वाणीचा इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कामचुकार कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी फैलावर घेतलंय. अशांवर कारवाई करण्यात येईल, अशा इशाराच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलाय. गरज पडल्यास अशा कामचुकार कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय.

गेल्या काही वर्षांपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामचुकारपणा सुरु असल्याचा आरोप केला जातो. अशांना मुख्यमंत्र्यांनी ठणकावलंय. दक्षता जागृती सत्पाहानिमित्त ते खातेप्रमुखांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सगळ्यांचीच झाडाझडती घेतली. कार्यालयीन त्रुटींवर त्यांनी बोट ठेवत अनेकांना सुनावलं होतं.

कामात हयगय केल्यास नारळ

स्वयंपूर्ण मित्रचं प्रशिक्षण अधिकाऱ्यांना दिलं जाणारे. स्वयंपूर्ण मित्रांसह खातेप्रमुख, कर्मचारी आणि वेळ पडल्यास आमदारही गावागावांत जाणार आहेत. या सगळ्यांकडून समस्या सोडवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. कामात हयगय करणाऱ्यांना दुर्लक्ष केलं जाणार ननाही. वेळ आल्यास कामावरुन कमी करण्यासही मागे पुढे पाहणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

हेही वाचा –

कांदा झाला गोड | रेशनकार्डवर मिळणार स्वस्त दरात कांदा

VIDEO VIRAL | दिवंगत पित्यास श्रद्धांजली वाहताना चिराग पासवान ड्रामा करता होते?

डबल ट्रॅकिंगविरोधात मध्यरात्री उद्रेक

फडणवीस, अजितदादा, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यानंतर आता स्मृति इराणींचा नंबर, कोरोना +ve

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!