कर्नाटकच्या मंत्र्यांशी म्हादईवर वन-टू-वन चर्चा नाहीच- मुख्यमंत्री

अमित शहांशी म्हादईवर चर्चा केली- प्रमोद सावंत

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : म्हादईवर कर्नाटकच्या जलस्त्रोत मंत्र्यांनी निशाणा साधल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय. म्हादईबाबत कर्नाटकच्या मंत्र्यांसोबत वन-टू-वन चर्चा करण्यास उत्सूक नसल्याचं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी म्हटलंय. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलंय.

काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी?

म्हादईप्रश्नावरुन मी अमित शहांकडे माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. कर्नाटकनं पाणी वळवल्याचे पुरावेही सुप्रीम कोर्टा दिलेले आहेत. आता कर्नाटकच्या मंत्र्यांशी वन-टू-वन चर्चा करण्यास मी उत्सुक नाही.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

म्हादईवर मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप खरे ठरले तर मी राजीनामा देईन, असं कर्नाटकच्या जलस्त्रोत मंत्र्यांनी म्हटलं होत. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी यावर आपली सविस्तर प्रतिक्रिया एएनआयशी बोलताना दिली आहे.

हेही वाचा –

‘म्हादईबाबतचे आरोप खरे निघाले तर मी राजीनामा देईन!’, मुख्यमंत्र्यांना कुणी दिलं प्रत्युत्तर?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!