‘आयआयटी होणारच! कुणालाही कायदा हातात घेता येणार नाही’

मेळावलीतील स्थानिकांचा आयआयटीविरोध कायम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गेले दोन दिवस प्रचंड गाजलेल्या आयआयटीविरोधातील आंदोलनानंतरही मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयआयटी होणारच, अशी कठोर भूमिका मुख्मयंत्र्यांनी घेतली असून कुणालाही कायदा हातात घेता येणार नाही, असंही त्यांनी नमूद केलंय. कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

हेही वाचा – बघाच! मेळावलीत पोलिसानं महिलेच्या पोटावर पाय दिला?

वाळपाई पोलिस स्थानकावर बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर या भागात मोठा तणाव पाहायला मिळाला. पीआय एकोस्करांविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती. तसंच मुख्यमंत्र्यांनी वाळपाईत येऊन आमची भेट घ्यावी अशीही मागणी केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी ही मागणी साफ फेटाळून लावली. तसंच दहाजणांचं शिष्टमंडळ आलं तरच चर्चा करु असंही म्हटलं होतं. त्यावरुन वाद आणखी पेटला. मुख्यमंत्र्यांनी वाळपईतच येऊन आमच्याशी चर्चा करावी, असं प्रतिआहावन आंदोलकांनी केलं. तसंच मुख्यमंत्र्यांनी केलेलं आवाहनही धुडकावून लावलं होतं.

हेही वाचा – बातमी आणि Video | मेळावलीचं सगळंकाही एका क्लिकवर!

अटक सत्राची टांगती तलवार

दरम्यान बुधवारी रात्री उशिरा वाळपई पोलिसांनी विश्वेश प्रभू यांनी मेळावलीतील लाठीचार्जप्रकरणी अटक केली. शेळ-मेळावलीचं प्रकरण आता क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आलंय. तसंच २३ जणांवर गंभीर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे वाळपईमध्ये पोलिस महासंचालकांची महत्त्वपूर्ण बैठकही सुरु आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आयआयटीविरोधाचा वाद एकीकडे थांबायचं नाव घेत नाही आहे, तर दुसरीकडे सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!