१३० आयएफबी कर्मचार्‍यांच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा…

युरी आलेमाव : आयएफबी व्यवस्थापनासोबत बैठक घेण्याची तयारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

वेर्णा : ३ वर्षांच्या सेवेनंतर नियमितीकरणाची मागणी करणाऱ्या गोव्यातील १३० तरुणांकडे असंवेदनशील भाजप सरकारने डोळेझाक केली आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांच्या मध्यस्थीने सदर प्रश्न तातडीने सोडवीण्याचा प्रयत्न करणार आहे. आयएफबी व्यवस्थापनाशी देखील एक सौहार्दपूर्ण तोडगा काढण्यासाठी बोलणी करण्याची माझी तयारी आहे असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
हेही वाचाःGoa Ration Scam : धान्य घोटाळा प्रकरणी क्राईम ब्रांचकडून फोंडा येथे चौकशी सुरु…

काँग्रेसचे नेते उपस्थित

वेर्णा औद्योगिक वसाहत येथे गुरुवारी आयएफबीच्या संपावर असलेल्या कामगारांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. शिष्टमंडळात काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा, एव्हरसन वालीस, कॅप्टन विरियाटो फर्नांडिस, मोरेनो रेबेलो आदी उपस्थित होते.
हेही वाचाःQR Code On Gas Cylinder : आता घरगुती गॅस सिलिंडरवर येणार ‘क्यूआर कोड’…

काँग्रेसचा जाहीरनामा लागू करा

भाजप सरकारने काँग्रेसचा जाहीरनामा लागू करावा, ज्यामुळे गोव्यातील बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही ५०० कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे जाहिरनाम्यात वचन दिले होते, असे युरी आलेमाव म्हणाले.
हेही वाचाःधक्कादायक ! प्रेयसीचा खून करुन प्रियकराने धावत्या ट्रेनसमोर मारली उडी…

बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात अयशस्वी

२०१२ मध्ये बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन दिलेले भाजप सरकार तीन निवडणुकांनंतरही स्वत:चे निवडणूक आश्वासन पूर्ण करू शकले नाही, हे खेदजनक आहे. आज दहा वर्षांनंतर ते ना बेरोजगारी भत्ता देत आहेत ना नोकऱ्या देत आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.
हेही वाचाःMopa Airport | मोपा विमानतळाच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला, पण…

बाहेरील लोकांना नोकऱ्या देण्याची प्रथा सुरू

केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी भाजप सरकारला इशारा दिला की, गोव्यातील युवकांना डावलून बाहेरील लोकांना नोकऱ्या देण्याची प्रथा सुरू झाल्यास राज्यात मोठी समस्या निर्माण होईल. मुख्यमंत्र्यांनी त्वरित हा प्रश्न सोडवावा, असे ते म्हणाले.
हेही वाचाःShraddha Walkar Murder Case : अफताबच्या नार्को चाचणीला परवानगी…

युवकांच्या हक्कासाठी लढा देऊ

काँग्रेस पक्ष नेहमीच गोमंतकीयांच्या हितासाठी लढला आहे. आम्ही युवकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या हक्कासाठी लढा देऊ, असे कॅप्टन विरियाातो फर्नांडिस यांनी सांगितले. काँग्रेस नेते मोरेनो रेबेलो यांनीही संपावर असलेल्या तरुणांना पाठिंबा देण्याचे वचन दिले.
हेही वाचाःएकाच वाहनाला दोन नंबरप्लेट, नक्की काय आहे हा प्रकार? वाचा सविस्तर…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!