दोतोर बोलले; काळजी घ्या, स्वतःला सांभाळा !

लॉकडाऊन नाहीच पण कडक निर्बंध

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी : गोव्यात शुक्रवारी कोरोना रूग्णांच्या आकड्यांनी अचानक उचल खाल्ल्याने अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्याची दखल घ्यावी लागली. संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकार परिषद बोलावली आणि राज्यातील सद्यस्थितीबाबत भाष्य केले. राज्यात लॉकडाऊन जारी होणार नाही. हॉटेल्स, पर्यटनावर कोणतेही निर्बंध नसतील पण स्थानिकांच्या सोहळ्यांवर मात्र सुरक्षेसाठी निर्बंध जारी करावे लागेल,असं ते म्हणालेत. पर्यटकांमध्ये स्थानिकांनी वावरू नये,असे आवाहन त्यांनी केलंय.

काय घेणार उपाययोजना ?

राज्याच्या पर्यटनाला अजिबात हात लावणार नाही या अविर्भावातच मुख्यमंत्र्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. पर्यटकांच्या गर्दीवर कोणतेही निर्बंध नसतील. हॉटेलांतील पार्ट्या तथा इतर सोहळ्यांवरही बंधने घालू शकत नाही परंतु जिथे स्थानिक एकत्र येतात तिथे मात्र निर्बंध घालावे लागतील,असं मुख्यमंत्र्यांनी सुचित केलंय. लग्न सोहळ्यांना शेकडो आणि हजारोंच्या संख्येने लोकांना आमंत्रण करू नका,असा सल्ला त्यांनी दिलाय. धार्मिक उत्सव साजरे करा. परंपरा जपा पण त्याचबरोबर आपल्या जीवालाही जपा,असाही सल्ला त्यांनी गोंयकारांना दिलाय.

कोरोनाचा सामना करायला राज्य सज्ज

कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारची सगळी यंत्रणा सज्ज आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा पूर्णपणे परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज आहे. लसींचा पुरवठा कुठेच कमी नाही. लसीकरण मोहीमेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणालेत. लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी अशी विनंती त्यांनी केलीए.

यावेळी त्यांनी जाहीर केलेले काही महत्वाचे मुद्दे असे…

 • राज्यात सद्या तरी लॉकडावन नाही
 • सार्वजनीक कार्यक्रमांवर निर्बंध
 • राज्यात लसींची कमतरता नाही
 • सोमवारपासून मोबाईल टेस्टींग व्हॅन.
 • मास्कचा वापर न करणाऱ्यांवर उद्यापासून दंडात्मक कारवाईची मोहीम
 • 8 तासांत आरटी-पीसीआर रिपोर्ट मिळणार
 • लग्न समारंभ तसेच एकत्र येण्याच्या सोहळ्यांवर निर्बंध
 • पर्यटन, हॉटेलांच्या कार्यक्रमांवर निर्बंध नाही
 • जिथे स्थानिक जमतात तिथेच निर्बंध लागू
 • उत्सवांना थोडा आळा घाला
 • परंपरा जपा पण स्वतःलाही जपा
 • पर्यटन व्यवसाय सुरूच राहाणार
 • निवडणूका ठरल्याप्रमाणे होणार, त्या रद्द करू शकत नाही
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!