नम्र विनंती, यंदा कसलेच सोहळे नकोत!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांचं गोंयकारांना आवाहन, मुख्यमंत्री मदत निधीसाठी देणगी देण्याचं आवाहन

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा शनिवारी 24 एप्रिलला वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांनी राज्यातील जनतेला कोरोना संसर्गापासून बचाव करून स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. यानिमित्त त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिलीये. त्यात त्यांनी गोंयकारांसाठी एक संदेश दिलाय.

हेही वाचाः CORONA VACCINATION | मी घेतली, तुम्ही कधी घेताय?

फेसबुकच्या माध्यमातून केलं गोंयकारांना आवाहन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फेसबूकवर पोस्ट करताना म्हटलंय, “दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त मला तुमच्याकडून शुभेच्छांच्या रूपात खूप प्रेम मिळतं. तुमचं हेच प्रेम आणि आपुलकी मला जनसेवेसाठी सतत प्रेरित करते. ऊर्जा देते. यावर्षी मात्र आपण कोरोना महामारीच्या विचित्र परिस्थितीतून जातोय. आणि सगळ्या सभा-समारंभांवर निर्बंध घालावे लागलेत. म्हणूनच मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की 24 एप्रिलला माझ्या वाढदिवसानिमित्त कसलेच कार्यक्रम आयोजित करू नका. मी स्वतःवरच निर्बंध घालून जनतेला या दिवशी भेटायचं नाही असं ठरवलंय. यानिमित्ताने तुमच्या शुभेच्छा SMS/WhatsApp मार्फत पाठवाव्यात. मुख्यमंत्री मदत निधी-गोवा खाते क्र. 10294307544 (एसबीआय, सेक्रेटेरिएट शाखा) या खात्यात तुम्ही देणगी दिलीत तर आनंदाची गोष्ट! तुम्ही सगळे, या भावनेचा आदर ठेवून मोठ्या मनाने सहकार्य कराल अशी आशा बाळगतो. देव बरें करूं!” असा संदेश मुख्यमंत्र्यांनी गोंयकारांना दिलाय.

3 मार्चला पहिला, तर 22 एप्रिलला घेतला कोविशिल्डचा दुसरा डोस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी कोरोनावरील त्यांनी पहिली कोविशिल्ड लस 3 मार्चला, तर कोविशिल्डचा दुसरा डोस त्यांनी 22 एप्रिलला साखळी येथील सरकारी रुग्णालयात जाऊन घेतला. याविषयी त्यांनी ट्विट करून माहिती दिली. तसंच गोंयकारांना लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहनही केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!