मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतील टॉप 10 मुद्दे

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी पत्रकार परिषद घेऊन नाईट कर्फ्यूची घोषणा केली. अनेक निर्बंधही जारी केले. मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या. त्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांचा हा आढावा…
नाईट कर्फ्यूची घोषणा, रात्री १० ते ६ पर्यंत नाईट कर्फ्यू, ३० एप्रिलपर्यंत नवे निर्बंध लागू
दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, शाळा, कॉलेज, क्रीडा महोत्सव सगळं बंद, फक्त ऑनलाईन शिक्षण सुरू
लग्नासाठी फक्त ५० लोकांनाच मुभा, अंत्यविधिसाठी २० लोकांना परवानगी
नव्या नियमांसह पालिका निवडणुका होणारच, निकालाच्या दिवशी कडक निर्बंध
मंदिर, चर्च, मशिदीत सामूहिक प्रार्थनेवर बंदी, पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र कुठेही जमू नये
लॉकडाऊन नाहीच, जास्तीचं सामान घेण्यासाठी बाजारात गर्दी करू नका
50 टक्के क्षमतेसह सरकारी, खासगी वाहतूक सुरूच राहणार
पर्यटकांवर बंधनं घालणार नाही
अत्यावश्यक सेवांना नाईट कर्फ्यू लागू नाही, पेट्रोलपंप सुरू राहणार
कॅसिनो, बार, रेस्टॉरंट फक्त 50 टक्के उपस्थितीत चालू राहणार