योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतः आग्वाद किल्ल्यावर केला योग

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः 21 जून हा जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त जगाच्या कानाकोपऱ्यात विविध योग कार्यक्रमांचं आयोजन करून हा दिवस साजरा केला जातोय. यानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी गोव्याचं वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर गोव्यातील आग्वाद किल्ल्यावर आयोजित योग कार्यक्रमात सहभागी होत योग केला.

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. योगमुळेच आपल्यापैकी लाखो लोकांना कोविड संकटाला सामोरं जाण्यास मदत झाली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा योग हा अविभाज्य भाग बनवू या, असं लिहिताना मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलंय.

मोदी सरकारने जगाला शिकवला योग

भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तनावडेंनीही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला. स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्याला योग हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने जगाला योगाबद्दल शिकवलं आहे, ज्यामुळे अनेक देशांनी योग हा त्यांच्या जीवनशैलीचा एक भाग म्हणून स्वीकारला आहे, असं उत्तर गोव्यात माध्यमांशी संवाद साधताना तानावडे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!