श्रीपादभाऊंबद्दल मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले…

एअर लिफ्ट करण्याची गरज नाही

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

ब्युरो : भीषण अपघातानंतर केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी गोव्यात उपचारासाठी आणण्यात आलं. त्यांना जीएमसीमध्ये दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांनी त्यांची तात्काळ पाहणी केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी श्रीपाईभाऊंच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणालेत की…

श्रीपाद नाईक यांची प्रकृती स्थिर आहे. पायाला फ्रॅक्चर असून त्यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना एअर लिफ्ट करण्याची गरज नाहीये. त्यांच्यावर जीएमसीत उपचार करण्यात येतील.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीपाद नाईक यांच्यावर आता जीएमसीमध्येच उपचार करण्यात येणार आहेत. डॉक्टरांचं विशेष पथक त्यांच्यावर उपचार करत असल्याचं कळतंय. दरम्यान सोमवारी रात्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. त्यांचा इनोव्हा क्रीस्टा या गाडीला झालेल्या भीषण अपघातात त्यांची पत्नी आणि आणखी एक जण दगावलाय. त्यामुळे नाईक कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अपघातानंतर श्रीपाद नाईक यांना तात्काळ गोव्यातील जीएमसी रुग्णालयात आणण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान, श्रीपाद नाईक हे अपघातात गंभीर जखमी झाले असून ते लवकराच लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली जाते आहे. तर श्रीपाद नाईक यांच्या पत्नीचा मृतदेहदेखील जीएमसीमध्ये आणण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!