आजपासून १५ वर्षांपर्यंतच्या पालकांनाही लसीकरणात प्राधान्य

लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी वयोमर्यादा वाढवली!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : आधी २ त्यानंतर ५ आणि आता तर १५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या पालकांचं मोफत लसीकरण करण्याचं लक्ष्य सरकारनं ठेवलंय. त्यानुसार आजपासून या वयोगटातली पालकांचं मोफत लसीकरण केलं जाणार आहे. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी रविवारी ६ जून रोजी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

उद्यापासून (७ जूनपासून) १८-१५ वयोगटातील नागरीकांच्या लसीकरणात १५ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांच्या पालकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. याची प्रत्येकानं नोंद घेऊन जे कुणी पात्र असतील त्यांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घ्यावी

असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

हेही वाचा : गव्यांचा कळप अडकला विर्नोडा-म्हस्कोण भागात

वयोमर्यादा वाढवल्यानं दिलासा

राज्यातील लसीकरणाऱ्या मोहिमेला वेग आणण्यासाठी ३ तारखेपासून लहान मुलांच्या पालकांचं लसीकरण सुरु करण्यात होतं. आधी हा वयोगट २ वर्ष ठेवण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ५ वर्षांपर्यतच्या मुलांच्या पालकांनाही या प्राधान्य गटात लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आता या मोहिमेच्या चौथ्या दिवशी अखेर लसीकरणाची वयोमर्यादा आणखी वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा : TOP 20 | ONE LINERS | महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर

राज्यातील लसीकरणाऱ्या मोहिमेला वेग आणण्यासाठी ३ तारखेपासून लहान मुलांच्या पालकांचं लसीकरण सुरु करण्यात होतं. आधी हा वयोगट २ वर्ष ठेवण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ५ वर्षांपर्यतच्या मुलांच्या पालकांनाही या प्राधान्य गटात लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, आता या मोहिमेच्या चौथ्या दिवशी अखेर लसीकरणाची वयोमर्यादा आणखी वाढवण्यात आली आहे.

corona update

जास्तीत जास्त मुलांच्या पालकांना लसीचा लाभ घेता यावा आणि लसीकरणाचं लक्ष्य गाठता यावं, यासाठी या प्राधान्य गटातील वयोमर्यादेत वाढ केल्याचं बोललं जातंय. दरम्यान, कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका लहानग्यांना सर्वाधिक असल्याचं बोललं जातंय. अशा पार्श्वभूमीवर पालकांचं लसीकरण तातडीनं होणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणंय. दरम्यान, आता वयोमर्यादा वाढवल्यामुळे राज्यातील जनता या लसीकरण मोहिमेला कसा प्रतिसाद देते, हे पाहणं महत्त्वाचंय.

हेही वाचा : CORONA UPDATE | पॉझिटिव्ह बातमी! सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!