मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यात आयुष-64 चा शुभारंभ

मातृभूमी सेवा प्रतिष्ठान गोवा यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी शहरातील पाटो येथे आयोजित कार्यक्रमात असिम्टोमेटिक, सौम्य आणि मॉडरेट कोविड-19 रुग्णांसाठी आयुष-64 च्या विनामूल्य वितरणाचा शुभारंभ केला. भारत सरकारच्या आयुष सरकार, केंद्रीय आयुर्वेद विज्ञान परिषद यांनी मातृभूमी सेवा प्रतिष्ठान गोवा यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन केलं.

आयुष-64 वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त

आयुष-64 हे आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय संशोधन परिषदेने (सीसीआरएएस) विकसित केलेलं एक पॉली हर्बल फॉर्म्युलेशन आहे आणि ते असिम्टोमेटिक, सौम्य आणि मध्यम रुग्णांच्या उपचारात वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त असल्याचं आढळलं आहे. आयुष-64 ला आयएमसीएसने मान्यता दिली आहे आणि कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे आणि त्याचे दुष्परिणाम होत नाहीत, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

विविध देशांमध्ये आयुष-64 औषधांचं वितरण

सध्याच्या कोविड-19 परिस्थितीत आम्ही जगातील इतर विविध देशांना आयुष-64 औषधं यशस्वीरित्या पुरवली आहेत.  केंद्र सरकारने यापूर्वीच देशातील इतर राज्यांमध्ये सांगितलेल्या औषधांचं वितरण सुरू केलं आहे. भारतात आपण भाग्यवान आहोत की विविध विषाणूजन्य आजारांवर आपल्या वातावरणात अतिशय प्रभावी आयुर्वेदिक औषधे आहेत, असं संरक्षण राज्यमंत्री  श्रीपाद नाईक म्हणाले.

मुख्यमंत्र्यानी  विविध सरकारी आरोग्य विभागांना, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या प्रतिनिधींना औषधांच्या साठा सुपूर्द केला. सी.सी.आर.ए चे संशोधन अधिकारी डॉ. एच. के. गुप्ता यांचंही यावेळी भाषण झालं. या कार्यक्रमाला सीसीआरएएसचे गोव्यातील उपसंचालक दत्ता भट, मतृभूमी सेवा प्रतिष्ठान गोव्याचे सरचिटणीस मिलिंद महाले आणि इतर उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!