काणकोण नगरपालिकेच्या नवीन इमारत बांधकामास राज्य सरकारची मंजूरी

उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांची माहिती; राज्य सरकारकडून प्रकल्पासाठी सुमारे 10 कोटी रुपये मंजूर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: काणकोण नगरपालिकेच्या नवीन इमारत बांधकामास राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. नगरपालिका मंडळाच्या मागणीनुसार काणकोणचे आमदार तथा विधानसभेचे उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी नवीन इमारतीचा प्रस्ताव सुडाकडे सुपूर्द केला होता. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रस्तावास मान्यता दिल्याची माहिती उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी दिली.

हेही वाचाः Tiger captured | सुर्ल भागात पट्टेरी वाघाच्या हालचाली कॅमेऱ्यात कैद

राज्य सरकारकडून प्रकल्पासाठी सुमारे 10 कोटी रुपये मंजूर

राज्य सरकारने या प्रकल्पासाठी सुमारे 10 कोटी रुपये मंजूर केले आहेत. लोकसंख्या वाढत असल्याने पालिकेची कामंही वाढत आहेत. यामुळे काणकोण नगरपालिकेची सध्याची इमारत कमी पडत असल्याचं फर्नांडिस यांनी सांगितलं. यामुळेच काणकोण पालिका मंडळाने माझ्याकडे नवीन आणि प्रशस्त इमारतीचा प्रस्ताव ठेवला होता. तो मी पुढे सुडाकडे पाठवला. तो मंजूर झाला असल्याचं फर्नांडिस म्हणाले.

हेही वाचाः अदानी समुहाचं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियंत्रण

पालिकेत विविध कामांसाठी येणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय

याकामी मंत्री मिलिंद नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चांगलं सहकार्य केलं. काणकोण पालिकेत विविध कामासाठी येणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पालिकेच्या नवीन इमारतीमागे पार्किंगतळाचाही प्रस्ताव पाठवला आहे. याचा लाभ येथील कर्मचारी आणि कामसाठी येणार्‍या नागरिकांना होईल. पार्किंग तळाचा प्रस्तावही लवकरच मंजूर होईल, असं इजिदोर फर्नांडिस यावेळी म्हणाले.

हेही वाचाः काँग्रेसचं लक्ष्य 2024 : राहुल, प्रियांका, प्रशांत किशोर यांच्यात चर्चा !

दरम्यान, काणकोण पालिकेच्या नवीन इमारतीचा मंजूर झालेल्या प्रस्तावाची प्रत मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिली असल्याचंही फर्नांडिस यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!