शंभर टक्के लसीकरणासाठी मुख्यमंत्री आग्रही

Goan Varta Live | प्रतिनिधी
डिचोलीः कोविड महामारीतून गोवा राज्याला सहीसलामत बाहेर येता यावं यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार तसंच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यामातून सर्वप्रयत्न सुरू आहेत. ‘टीका उत्सवा’च्या माध्यमातून प्रत्येक पंचायत क्षेत्रातील पालिका विभागातील व्यक्तीने लस घ्यावी हा आपला आग्रह असून त्यासाठी पंच, सरपंच, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि सामाजिक संस्थांनी जागृती करून लोकांना लसीकरण करून घेण्यास आग्रह करावा, असं आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोलीत केलं.
हेही वाचाः राज्यातील सर्व नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देणार; शेतकऱ्यांनाही मिळणार भरपाई
झांट्ये सभागृहातील कोविड लसीकरण केंद्राला मुख्यमंत्र्यांनी दिली भेट
झांट्ये सभागृहात सुरू असलेल्या कोविड टीका उत्सवाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी भेट दिली. तसंच लसीकरणासाठी तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. प्रत्येक व्यक्तीने लस घ्यावी, असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं. यावेळी लसीकरण केंद्रावर उपस्थितांची विचारपूस केली आणि त्यांच्याकडून कोविड तसंच इतर बाबतीत माहिती घेतली. गावागावातील लोकांनी आपल्या कुटुंबियांना, शेजाऱ्यापाजाऱ्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावं तसंच टीका उत्सव शंभर टक्के यशस्वी करण्यात योगदान द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
हेही वाचाः दवर्लीत पोलिसांकडून कारवाई; बाजार अखेर बंद
कोविड लसीकरण जागृती प्रत्येकाचं दायित्व
कोविडला जर हरवायचं असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे, की त्याने स्वतःहून पुढे येऊन कोविडशी दोन हात करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी. त्याच प्रमाणे सामाजिक दायित्व पार पाडताना ज्यांचं लसीकरण झालेलं नाही, त्यांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावं, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
हेही वाचाः आम्हाला विश्वासात का घेतलं नाही?, काँग्रेस पुरस्कृत नगरसेवकांचा कामतांवर घणाघात
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत सभापती राजेश पाटणेकर, आमदार प्रवीण झाट्ये, नगराध्यक्ष कुंदन फळारी, अभिजित तेली तसंच इतर मान्यवर उपस्थित होते.