मुख्यमंत्र्यांच्या बेजबाबदारपणाचा कळस! जमावबंदीचं कांय? कुठे हरवलं सोशल डिस्टंन्सिंग?

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : एकाबाजूला राज्यात कोरोनाने दिवसाला ३० पेक्षा लोकांचा मृत्यू होत असताना दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्र्यांच्या बेजबाबदारपणाचा कळस पहायला मिळत आहे. बुधवारी सकाळी विठ्ठलापूर साखळीतील नव्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन पार पडलं. मात्र या उद्घाटन सोहळ्याला लोकांची तोबा गर्दी पहायला मिळाली.

सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा, कलम १४४ पायदळी

राज्याचे मुख्यमंत्री कोविड संसर्ग बंद व्हावा यासाठी लोकांना दररोज उपदेशाचे डोस पाजत असतात. मात्र विठ्ठलापूर येथील पुलाच्या उद्घाटन सोहळ्यात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. कलम १४४ पायदळी तुडवण्यात आलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्री बिनधास्त लोकांशी गप्पा गोष्टी करताना पहायला मिळाले.

मुख्यमंत्र्यांनी लोकांना का नाही दिली समज?

ज्या ठिकाणी ५० पेक्षा जास्त लोक एकत्र येतील तिथं पोलिस कडक कारवाई करतील असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता. आता खुद्द मुख्यमंत्रीच या नियमाच खुलेआम उल्लंघन करताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याठीकाणी जमलेल्या लोकांना माघारी जाण्याचा सल्ला देत परिस्थितीचं भान का नाही ठेवला हा मोठा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. म्हणजे जे काही नियम आणि अटी आहेत त्या फक्त सर्वसामान्य लोकांनाच लागू पडतात आनी मुख्यमंत्र्यांना लागू होत नाहीत का असा सवालही उपस्थित केला जातोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!