मुख्यमंत्र्यांनी डिचोलीत घेतला वादळाचा आढावा

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः काही तासांसाठी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने राज्याचा चेहरामोहराच बदलून टाकला. या चक्रीवादळाने राज्यात विध्वंस निर्माण केला. या चक्रीवादळामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पडझड झालीए. कोट्यवधी रूपयांचे नुकसान झालंय. शहरी आणि ग्रामिण अशा दोन्ही भागांना या चक्रीवादळाने दणका दिल्यामुळे प्रचंड प्रमाणात लोकांचे नुकसान झालंय. या वादळाने दोन बळी गेले असले तरी वित्त हानी मोठी झालीए. बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोली मामलेदार कार्यालयाला भेट देऊन आढावा बैठक घेतली. यावेळी तौक्ते चक्रीवादळात डिचोली तालुक्यात किती नुकसान झालं आणि कोविड परिस्थिती जाणून घेतली.

बैठकीला सभापती आणि अधिकारी उपस्थित
बुधवारी डिचोलीत पार पडलेल्या या बैठकीला सभापती राजेश पाटणेकर, उपजिल्हाधिकारी दिपक वायंगणकर, डिचोलीचे मालमेदार प्रविणजय पंडित, पोलिस अधिकारी, पोलीस, वीज खाते, अग्निशामक दल, कृषी खाते यांचे अधिकारी उपस्थित होते. तौक्ते चक्रीवादळाने डिचोली तालुक्याचं किती नुकसान केलं याची मुख्यमंत्र्यांनी यावेळी यांच्याकडून माहिती घेतली.
हेही वाचाः आता हॉस्पिटल्सबाबत ‘या’ ई-मेल आयडीवर तक्रार करा
अग्निशमन दलाची स्तुती
यावेळी मुख्यमंत्र्यांनी अग्निशामक दलाची स्तुती केली. अग्निशामक दलाने खूप चांगलं काम या चक्रीवादळात केलं असल्याचं ते म्हणाले. कोविड परिस्थितीविषयी बोलताना आता परिस्थिती आटोक्यात येत असून डिचोलीतील केशव सेवा साधना कोविड सेंटराचं एक स्टेप अप हॉस्पिटलात रूपांतर करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं. 71 खाटांच्या या सेंटरमध्ये 20 खाटांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे.
हेही वाचाः 20 मे पासून टुरिस्ट टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू
लसीकरण हा एकच पर्याय
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हा एकच पर्याय आहे. त्यामुळे सगळ्यांनी लसीकरण करून घेणं महत्त्वाचं आहे. अजूनही 45 वर्षांपेक्षा जास्त नागरिकांनी लस घेतली नाही, ती त्यांनी त्वरित घ्यावी. 18 ते 44 वर्ष वयाच्या नागरिकांच्या लसीचा साठा कमी असल्यामुळे स्लॉट पद्धतीने लस देणं चालू आहे. एकदा पूर्ण साठा आला की नंतर नागरिकांना ताटकळत रहाण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच राज्यात लावलेल्या कर्फ्यूमुळे कोविड परिस्थिती आटोक्यात यायला मदत झाल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच अजून कर्फ्यू वाढविण्याबाबत कसलाच निर्णय घेतला नसल्याचं ते यावेळी म्हणाले.
हेही वाचाः तरुण तेजपाल खटल्याचा आजचा अंतिम निवाडा पुढे ढकलला, 21 मे रोजी निकाल
रविवारी चक्रीवादळामुळे राज्यात दाणादाण
तौक्ते चक्रीवादळाने रविवारी राज्यात दाणादाण उडवली. जोरदार पाऊस आणि सोबत 70 ते 80 किलोमीटर वेगाचा सोसाट्याचा वारा यामुळे प्रचंड हानी झाली. किनारी भागांत पाण्याची पातळी वाढल्याने तेथील वस्तींचे मोठे नुकसान झालेय. शेतकरी, बागायतदारांचे उभे पीक आडवं पडलंय. ग्रामिण भागांतील लोकांच्या घरांचे मोठे नुकसान झालंय.