पंतप्रधानांच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

18 वर्षांवरील सगळ्यांचं केंद्राकडून मोफत लसीकरण करण्याची पंतप्रधानांनी केली घोषणा

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः आज संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या. यावेळी पंतप्रधानांकडून मोठी घोषणा करण्यात आली. 18 वर्षांवरील सगळ्यांचं केंद्राकडून मोफत लसीकरण करण्याची पंतप्रधानांनी घोषणा केली. पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांकडून स्वागत करण्यात आलंय. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर राज्यातील लसीकरणाला गती प्राप्त होईल, अशी आशा आहे.

हेही वाचाः धक्कादायक! खासगी हॉस्पिटलमधील कोविडबाधित मृतांची माहिती लपवली…

मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत केलं पंतप्रधानांच्या घोषणेचं स्वागत

मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 18 वर्षांवरील सगळ्यांचं केंद्राकडून मोफत लसीकरण करण्याच्या घोषणेचं स्वागत करण्यात आलंय. ट्विट करताना मुख्यमंत्री म्हणालेत, 21 जून 2021 पासून सर्व राज्यांना मोफत लस पुरवण्याची पंतप्रधान नरेंद्र मोंदींनी केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. त्यांनी उचललेल्या या पावलाचं मी स्वागत करतो. पंतप्रधानांच्या या घोषणेमुळे देशातील लसीकरण मोहिमेला वेग प्राप्त होईल तसंच गोव्यात 100 टक्के लसीकरणाचं सरकारचं उद्दिष्ट साध्य होऊ शकेल.

‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ वाढवण्याचा निर्णय कौतुकास्पद

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजींचा ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ दिवाळीपर्यंत वाढवण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. याचा गरीब आणि गरजूंना कोविड महामारीच्या या कठीण काळात मोठा फायदा होईल. गोव्याने यापूर्वीच मे आणि जूनसाठी 100% कोटा उचलला आहे आणि राज्यात वितरण सुरू केले आहे, असं मुख्यमंत्री ट्विट करताना म्हणालेत.

परवानगी दिल्याबद्दल मी मोदी सरकारचा आभारी

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, परदेशात नोकरी करणाऱ्या गोंयकारांना तसंच खेळाडूंना 28 दिवसांनंतर कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्याची परवानगी दिल्याबद्दल मी मोदी सरकारचा आभारी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी ट्विट करताना म्हटलंय.

पंतप्रधानांनी आज साधला जनतेशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संध्याकाळी 5 वा. जनतेशी संवाद साधताना 18 वर्षावरील व्यक्तिंचं मोफत लसीकरण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. लसीकरणाची सर्व जबाबदारी राज्याची नसून केंद्राची असणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात केंद्र सरकारला फटकारलं होतं. त्यामुळे मोदी सरकारने ही जबाबदारी घेतल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!